राहुरी : कोविड सेंटरमधून कैदी रफूचक्कर
सार्वमत

राहुरी : कोविड सेंटरमधून कैदी रफूचक्कर

Arvind Arkhade

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी कृषी विद्यापीठ येथे नगर जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी तयार केलेल्या तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमधून शनिवारी सकाळी एक कैदी पळाल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.

राहुरी येथिल महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे नगर जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी शेतकरी निवासमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे . तेथे श्रीरामपूर, पारनेर व नेवासा पोलिस ठाण्याच्या उपकारागृहातील करोना पॉझिटिव्ह आढळलेले 55 कैदी ठेवले होते.

त्यातील एका कैद्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आज पलायन केले. शेतकरी निवास इमारतीच्या आसपास जिल्ह्यातील पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे. शिवाय इमारतीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.

पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून कैदी पसार झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांनी नगर येथे सबजेल जवळ एका शाळेची पाहणी करून, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह कैद्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात राहुरी येथे कृषी विद्यापीठातील इमारतीत करोना बाधित कैद्यांना ठेवले आहे. या कैद्यावर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा पोलीस पथके शोध घेत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com