राहुरी तालुक्यातील 60 गावे करोनामुक्त

राहुरी तालुक्यातील 60 गावे करोनामुक्त

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी (Rahuri) तालुक्यातील 60 गावे करोनामुक्त (Covid 19) झाले आहेत. मागील महिन्यात तालुक्यातील 102 गावांपैकी 45 गावे करोनामुक्त झाले होते. आता 60 गावे करोनामुक्त झाल्याने राहुरी तालुक्याची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यातच करोनाग्रस्तांच्या आकडेवारीत चढउतार सुरू असून कमी होत जाणारी आकडेवारी प्रशासनासह (Administration) नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे.

दरम्यान, राहुरी (Rahuri) तालुक्यातील राहुरी शहर, देवळाली प्रवरा (Devlali Pravara), कनगर, वांबोरी (Vambori), ही चार गावे करोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या चार गावंवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून करोनाची नियमावली (Covid 19 Rules) राबविण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले. राहुरी शहरासह तालुक्यात मागील जून महिन्यात करोनाग्रस्तांच्या आकडेवारी एक हजाराच्या आतच अबाधित राहिली. मात्र, अनलॉक (Unlock) होताच नियमात शिथिलता आल्याने आता विवाह, वाढदिवस, सामुदायिक सोहळ्यांचा पुन्हा गजबजाट सुरू झाला असून या सोहळ्यांना नागरिक विनामास्क गर्दी करू लागले आहेत. अंत्यविधीसाठी होणार्‍या गर्दीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे.

तालुक्यात मे महिन्यात बधितांची संख्या 100 च्या पुढे जाऊन 300 पर्यंत गेली होती. जून महिन्यात करोना बधितांची संख्या झपाट्याने कमी होत गेल्याने 1 जूनपासून 50 च्या आसपास बधितांची संख्या आली. या महिन्यात आतापर्यंत फक्त 8 दिवस 50 पेक्षा जास्त बाधित सापडले आहेत. दररोज 50 पेक्षा बधितांची संख्या कमी येत आहे. राहुरी तालुक्यातील राहुरी, देवळाली प्रवरा येथे नगर पालिका (Municipality) असल्याने लोकसंख्या जास्त आहे. तसेच नागरिकांचा वावर देखील जास्त आहे. त्यामुळे सहाजिकच येथे करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार होत आहे. मात्र, कणगर येथे करोनाचा संसर्ग (Covid 19 infection) अद्याप थांबायला तयार नाही. तर वांबोरीत देखील मोठी बाजारपेठ असल्याने येथे करोना रुग्ण आहेत. एकंदर तालुक्याची वाटचाल करोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com