राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 'एवढे' करोना रूग्ण

राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 'एवढे' करोना रूग्ण
File Photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात काल शुक्रवारी दिवसभरात करोनाबाधितांनी द्विशतक ओलांडले. काल 216 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. मात्र, दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढूनही पोलीस आणि महसूल खाते करोना महामारी नियंत्रणात आणण्यात

अपयशी ठरत असून केवळ नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा फार्स करीत आहे. तालुक्यात अद्यापही अनेक करोनाबाधित रूग्ण महागड्या औषधोपचारामुळे घरीच घरगुती उपचार करीत असून त्यामुळे तालुक्यात करोना महामारीचा धोका आणखी वाढला आहे.

सध्या राहुरी तालुक्यात जनता कर्फ्यू सुरू आहे. मात्र, तरीही करोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यात प्रशासकीय यंत्रणेला अपयश आले आहे. तालुक्यासह राहुरी शहरातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राहुरी शहरासह ग्रामीण भागातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

तर ग्रामीण भागात लॉकडाऊन असूनही नागरिक बाहेर फिरत असून विनामास्क नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आणखी रूग्णसंख्येत भर पडली आहे.

सध्या तालुक्यातील अनेक कोव्हिड सेंटरमध्ये करोनाबाधित रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठी हेळसांड होत आहे. अनेक ठिकाणी बेड, ऑक्सिजन व इंजेक्शन उपलब्ध नाही. तर काही कोव्हिड सेंटरमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com