राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 317 करोनाग्रस्त

राहुरी तालुक्यात एकाच दिवसात 317 करोनाग्रस्त

आजपासून गाव 5 दिवसासाठी संपूर्ण लॉकडाऊन

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात काल मंगळवारी पुन्हा एकदा करोनाबाधितांच्या संख्येचा उद्रेक झाला. दिवसभरात सुमारे 317 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

दरम्यान, एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असताना रूग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यास प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तालुक्यात राहुरी शहरासह ग्रामीण भागातही करोनाचा विळखा बसू लागल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या लसीकरणही ठप्प असून आरोग्य सेवा कोलमडली असून कोविड सेंटरमध्ये अत्यावश्यक सेवा नसल्याने ती कुचकामी ठरली आहेत. आरोग्य सेवेच्या कमतरतेमुळे बळींची संख्या वाढत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com