Corona
Corona
सार्वमत

राहुरी तालुक्यात 22 जणांना करोनाची बाधा

रॅपीड चाचणीत 10 महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह; तालुक्याची संख्या 150

Arvind Arkhade

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यात काल एकाच दिवशी तब्बल 22 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता राहुरी तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 150 वर जाऊन पोहोचली आहे. देवळाली प्रवरा येथे केलेल्या रॅपीड अ‍ॅन्टीजेन चाचणीत 16 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. काल एकाच दिवशी विक्रमी संख्येने संक्रमण झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यात दहा महिलांचा समावेश आहे.

देवळाली प्रवरा येथे दोनजणांना तर राहुरी फॅक्टरी येथे तीनजणांना बाधा झाली आहे. यात दोन पुरूष तर तीन महिलांचा समावेश आहे.टाकळीमिया येथे आठ जणांना बाधा झाली. त्यात तीन पुरूष तर पाच महिलांचा समावेश आहे. गुहा येथे दोन जणांना बाधा झाली असून यात एक पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. तर देसवंडी येथे एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील राहुरी कारखाना येथील तीन व्यक्ती तर देवळाली प्रवरा येथील दोन व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे शनिवारी घेण्यात आलेल्या 49 व्यक्तींच्या रॅपीड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये पाच व्यक्ती करोना बाधीत आढळल्या.

देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अण्णासाहेब मासाळ व मुख्याधिकारी अजित निकत यांनी शोध घेऊन 49 व्यक्तींच्या रॅपीड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये पाच व्यक्ती बाधीत आढळले आहेत.

दरम्यान, राहुरी तालुक्यात करोना संक्रमणाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून महसूल व आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांची नाराजी वाढली आहे. तालुक्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com