राहुरी तालुक्यात एकाच दिवशी सातजणांना करोनाची बाधा

राहुरी तालुक्यात एकाच दिवशी सातजणांना करोनाची बाधा

रूग्णसंख्या पोहोचली 65 वर; बारागाव नांदूरला पाचजण बाधीत

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यात काल शनिवारी दिवसभरात 7 करोना बाधित रूग्ण आढळून आले. त्यामुळे आता राहुरी तालुक्यातील बाधितांची संख्या 65 वर जाऊन पोहोचली आहे.

काल दिवसभरात देवळाली प्रवरात दोन, उंबरे येथे एक तर बारागाव नांदूरला चारजणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. तर यापूर्वी केसापूर 4, पाथरे 1, सोनगांव 4, वांबोरी 4, तांदुळवाडी 2, म्हैसगांव 3, वरवंडी 6, राहुरी फॅक्टरी 10, देवळाली (शेटेवाड़ी) 1, देवळाली 4, कात्रड 4, वळण 1, राहुरी शहर 9, तमनर आखाडा 1, गुहा 1, तांदुळनेर 1, बारागांव नांदुर 5, डिग्रस 1, उंबरे 3, असे बाधीत आढळून आले आहेत.

यापैकी उपचार पूर्ण झालेले रूग्ण 22 असून 43 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर यातील 8 रूग्ण खासगी रूग्णालयात उपचार घत आहेत. राहुरी विद्यापीठ येथे 60 जणांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.

कालअखेर एकूण स्वॉब घेतलेल्या 385 पैकी 293 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 29 रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला असून 63 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.

गेली चार महिने एकही करोनाचा रूग्ण नसलेल्या देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीमध्ये हळूहळू करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. हा आकडा अकरावर पोहचला असताना करोना संशयित म्हणून शहरामधील एका तरूणाला काल तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी दिली.

काल सकाळी देवळाली प्रवरा शहरातील एक तरूण करोना संशयित आढळून आल्याने त्याला तपासणीसाठी विद्यापीठ येथे पाठविले आहे. दोन दिवसानंतर त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. दरम्यान, देवळाली प्रवरा महसूल मंडलात आढळून आलेले दोन करोना बाधित हे बाहेरचे रहिवाशी आहेत. ते फक्त कामानिमित्ताने येथे येत असल्याने त्यांना त्यांच्या गावाकडे वर्ग करण्यात आले असल्याचे डॉ. मासाळ यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील एक तरूण नगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी गेला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्या संपर्कात असणार्‍या तरूणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यानंतर पुन्हा एका तरूणाला करोनाची बाधा झाल्याने संपर्कात आलेल्या रूग्णांची संख्या तीनवर गेली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या संपर्कात असणारे त्याच्या कुटुंबातील वीसजणांबरोबर संपर्कात असणारे पाच अशी एकूण पंचवीस जणांची तपासणीसाठी रवानगी करण्यात आली. त्यापैकी तीनजणांचे अहवाल आले असून त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला ताबडतोब नगरला उपचारासाठी हलविले आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाने स्वतःला होम क्वारंटॉइन करून घेतले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com