राहुरी तालुक्यात 48 तासांत 16 जणांना करोनाची बाधा
सार्वमत

राहुरी तालुक्यात 48 तासांत 16 जणांना करोनाची बाधा

Arvind Arkhade

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यात सोमवारी सहा तर काल मंगळवारी (दि.11) एकाच दिवशी दहाजणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे गेल्या अठ्ठेचाळीस तासांत राहुरी तालुक्यात एकूण 16 जणांना करोनाची बाधा झाली आहे.

राहुरी तालुक्यात करोना संक्रमणाचा धोका वाढू लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. राहुरी तालुुक्यात एकूण बाधितांची संख्या 180 वर जाऊन पोहोचली आहे.

काल रॅपीड अ‍ॅन्टीजेन तपासणीत दहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कानडगावला पाचजणांना करोनाची बाधा झाली. त्यात तीन पुरूष, दोन महिलांचा समावेश आहे. गुहा, राहुरी शहर व विद्यापीठ फार्म क्वॉर्टरमध्ये प्रत्येकी एक जणाचा व बोधेगावला दोनजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com