राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी-शहरात गेल्या आठवडाभरात तब्बल 99 नागरिकांना तर तालुक्यात 327 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे नागरिकांसह प्रशासनही हतबल झाले आहे. यात महिला रूग्णांचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी देवळाली प्रवरा व राहुरी शहरात भेट देऊन पाहणी केली. करोना महामारीचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी 41 जणांना तर काल दिवसभरात सुमारे 49 जणांना करोनाची बाधा झाली. राहुरी तालुक्यात करोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असून तालुक्यात आठवडाभरासाठी लॉकडाऊनची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासकीय पातळीवर करोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू असून पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणार्यांवर तालुक्यात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. वांबोरी, राहुरी शहर, देवळाली प्रवरा, राहुरी विद्यापीठ येथे रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातही करोना महामारीचा फैलाव सुरू झाला आहे.