राहुरी मतदारसंघात तलाव दुरूस्तीसाठी 2 कोटी 22 लाख- ना. तनपुरे

राहुरी मतदारसंघात तलाव दुरूस्तीसाठी 2 कोटी 22 लाख- ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील ताहाराबाद, वांबोरी, धामोरी खु., गुहा, चिंचाळे, कनगर, रामपूर तसेच नगर तालुक्यातील बहिरवाडी व इमामपूर येथील पाढर तलावांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने रु.2 कोटी 22 लाख 5 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे राज्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

ना. तनपुरे म्हणाले, मतदार संघातील राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार्‍या पाझर तलाव दुरुस्तीसाठी ताहाराबाद (19 लाख 81 हजार), वांबोरी (30 लाख 4 हजार), वांबोरी राऊत वस्ती (7 लाख 32 हजार), धामोरी खु.(14 लाख 6 हजार), गुहा खपके वस्ती (5 लाख 98 हजार ), चिंचाळे गडधे आखाडा (3 लाख 50 हजार ), कनगर घाडगे वस्ती (3 लाख 59 हजार ), रामपूर सरोदे वस्ती (4 लाख 77 हजार), रामपूर साबळे वस्ती (5 लाख 53 हजार ) तसेच नगर तालुक्यातील बहिरवाडी काळेवस्ती (28 लाख 61 हजार), बहिरवाडी वाकी वस्ती (48 लाख 43 हजार), इमामपूर महादेव मंदिर रस्ता (26 लाख 85 हजार), इमामपूर पालखीचा ओढा (23 लाख 56 हजार), येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी एकूण 2 कोटी 22 लाखांचा निधी जिल्हा परीषद मालकीचे पाझर तलावांना मंजूर झाला आहे.

राहुरी नगर तालुक्यातील तलावांचे दुरुस्तीचे कामे बर्‍याच वर्षापासून झालेले नव्हते. या तलावांची अवस्था अतिशय बिकट झाल्याने पाणी गळतीचे प्रमाणही अधिक होते. पावसाळ्यातील पाणी साचून गळतीमुळे तलाव लवकर कोरडे पडत होते. मंत्री तनपुरे यांच्याकडे येथील लाभधारक शेतकर्‍यांनी तलाव दुरुस्तीची मागणी केली होती. या मागणीची त्यांनी गंभीरतने दखल घेऊन मंत्री तनपुरे यांनी शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा करुन जलसंधारण विभागाने या तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजूर केल्याने या परिसारातील शेतकर्‍यांचे क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

तसेच राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील उर्वरित पाझर तलावांची दुरुस्ती निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा चालू असून लवकरच या कामांना मंजुरी मिळण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले. याकामामुळे राहुरी तालुक्यातील व नगर तालुक्यातील लाभधारक शेतकर्‍यांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.