राहुरी मतदारसंघातील घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 3 कोटी 27 लाख मंजूर - ना. तनपुरे

राहुरी मतदारसंघातील घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 3 कोटी 27 लाख मंजूर - ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

स्वच्छ भारत अभियान मिशन ग्रामिण महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा स्वच्छता विभागांंतर्गत राहुरी विधानसभा मतदारसंघातील 11 गावांकरीता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी 3 कोटी 27 लक्ष 40 हजार 440 रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगरविकास उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मंत्री तनपुरे यांनी सातत्याने पाठपुरावा करत मंजुरी प्राप्त करुन घेतली आहे. यात वांबोरी 1 कोटी 57 लक्ष 6 हजार 128 रुपये व नगर तालुक्यातील जेऊरसाठी 76 लक्ष 48 हजार 472 रुपये, पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे 6 लक्ष 28 हजार, चिचोंडी 10 लक्ष 38 हजार 580 रुपये, धामोरी खु. 6 लक्ष 21 हजार 975 रुपये, सडे 13 लक्ष 71 हजार 545 रुपये, वळण 13 लक्ष 32 हजार 154 रुपये, खडांबे खु. 14 लक्ष 62 हजार 129 रुपये, बाभुळगांव 8 लक्ष 37 हजार 414 रुपये, तांदुळनेर 5 लक्ष 68 हजार 566 रुपये, तांभेरे 15 लक्ष 24 हजार 550 रुपयांचा निधी तीन टप्यात येणार आहे. पहिला टप्पा 30 टक्के, दुसरा टप्पा 50 टक्के व तिसरा टप्पा 20 टक्के रक्कम पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून येणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी मतदारसंघातील 11 गावांमध्ये दिवसेंदिवस वाढते नागरीकरण यामुळे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाकरीता स्वतंत्र निधी द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतींनी मंत्री तनपुरे यांच्याकडे केली होती.त्यानुसार पहिल्या टप्प्यात हा निधी प्राप्त झाला असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. या 11 गावांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाकरीता निधी मिळावा, यासंबंधी राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मंत्री तनपुरे यांनी वेळोवेळी मागणी करुन पाठपुरावा केला.

या गावांमध्ये 3 कोटी 27 लक्ष 40 हजार 440 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून महत्वपूर्ण अशी मागणी मंत्री तनपुरे यांनी पूर्ण केल्याने मतदारसंघातील गावांनी तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com