राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

भाजप सरकारने शेतकर्यांचेच नव्हे तर सामान्य नागरिकांचे जीवन मुश्किल केले. आजपर्यंत शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ होती.

मात्र, केंद्र सरकारच्या तीन काळ्या कायद्यांमुळे सामान्य जनतेवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. असे मनोगत राहुरी तहसील कार्यालयासमोर काँग्रेस आयच्या वतीने करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनप्रसंगी डॉ. जयंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात संपूर्ण देशातील शेतकरी व कामगार दिल्लीच्या सिमांवर गेल्या शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत.

तसेच दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. मात्र, हिटलरशाही वृत्तीचे मोदी सरकार या बाबींवर एकही शब्द बोलायला तयार नाही. म्हणून तीन काळे कायदे तसेच महागाईच्या मुद्यांवर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना निवेदन देऊन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव म्हणाले, शेतकर्यांवर लादलेल्या या तीन काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सचिव पंढरीनाथ पवार, सहसचिव कैलास पटारे, सरचिटणीस संजय पोटे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, उपाध्यक्ष संजय भोसले, बबनराव ढोकणे, संघटक गोरक्षनाथ ढोकणे, अण्णासाहेब दुशिंग, एकनाथ दुशिंग, सोपान गाडे, दादा आढाव, अशोक ढोकणे, भीमसेन पवार, रामभाऊ डौले, अरिफ शेख, मारूती मंडलीक उपस्थित होते.