जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट; आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा

कामचुकार व हलगर्जीपणा करणारे डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांना धरले धारेवर; कारवाईचे संकेत
जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट; आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा

राहुरी | प्रतिनिधी

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचे समवेत राहुरी ग्रामीण रुग्णालय व बालाजी कोविड सेंटरला अचानक भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत असताना अनेक त्रुटी त्यामधे आढळून आल्याने मोठी नाराजी व्यक्त केली असुन कामचुकार व हलगर्जीपणा करणारे डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरत कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले.

जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट; आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा
दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हारच्या बाजारपेठेत मारला राउंड

अहमदनगर जिल्ह्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नसलेल्या व्यक्तीविरुद्ध आणि आस्थापना विरुद्ध कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्ह्यात काही घटकांना ठराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

नागरिकांनीही कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नसलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे राहुरी तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले.

Related Stories

No stories found.