राहुरी बाजार समितीत तनपुरे गटाचा दणदणीत विजय

राहुरी बाजार समितीत तनपुरे गटाचा दणदणीत विजय
USER

राहुरी (तालुका प्रतिनिधी)

राज्यातील अग्रगण्य असलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. प्राजक्त तनपुरे गटाच्या महाविकास आघाडी (तनपुरे गट) ने 16 जागा जिंकून निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. तर विरोधीला भाजपा (विखे, कर्डिले गट) अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले.

एकूण 39 उमेद्वार निवडणूक रिंगणात राहील्याने महाविकास आघाडी (तनपुरे गट) व भाजप (विखे व कर्डिले गट) यांच्यात सरळसरळ लढत झाली. या निवडणुकीत दिग्गज उमेदवार उभे असल्याने रंगत वाढली होती.

राहुरी बाजार समितीत तनपुरे गटाचा दणदणीत विजय
APMC Election 2023 : राहुरीमध्ये मतदानावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस; मतदार, उमेदवार अन् निवडणूक यंत्रणेची उडाली धांदल

राहुरी बाजार समितीच्या 18 जागेसाठी काल 28 एप्रिल 2023 रोजी मतदान झाले. सोसायटी मतदार संघात 1383 पैकी 1370, ग्रामपंचायत मतदार संघात 842 पैकी 830, व्यापारी मतदार संघात 338 पैकी 330 तर हमाल व मापाडी मतदार संघात 238 पैकी 234 अशा एकूण 2800 पैकी 2764 (98.71 टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

बाजार समितीच्या 18 जागेत सेवा सोसायटी मतदार संघात 11 जागांमधील प्रवर्गाच्या 7 जागांसाठी 16, महिला प्रवर्गाच्या दोन जागांसाठी 4, इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 3 व एन.टी. प्रवगाच्या 1 जागेसाठी 2 उमेद्वार निवडणूक रिंगणात होतेे. ग्रामपंचायत मतदार संघातून 4 जागा निवडून द्यायच्या होत्या. त्यात खुल्या प्रवगाच्या दोन जागांसाठी 4, आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गाच्या 1 जागेसाठी 2 व अनु. जाती जमाती प्रवगाच्या एका जागेसाठी 2 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. व्यापारी मतदार संघांच्या 2 जागांसाठी 4 तर हमाल मापाडी मतदार संघाच्या 1 जागेसाठी 2 असे एकूण 39 उमेद्वार निवडणूक आखाड्यात उतरले होते. 1 जागा पणन मतदार संघांसाठी राखीव आहे.

राहुरी बाजार समितीत तनपुरे गटाचा दणदणीत विजय
Crime News : क्षुल्लक कारणावरुन वाद, दगडाने वार करून निर्घृणपणे संपवलं

मतदानाची उमेदवार निहाय आकडेवारी

महाविकास आघाडी (तनपुरे गट)चे सोसायटी मतदार सघांच्या खुल्या प्रवर्गातून अरूण बाबुराव तनपुरे(814, विजयी), महेश केरू पानसरे(714, विजयी), बाळासाहेब रखमाजी खुळे(724, विजयी), दत्तात्रय यादव कवाणे(624, विजयी), नारायण धोंडीराम सोनवणे(663, पराभूत), विश्‍वास धोंडीराम पवार(661, पराभूत), रखमाजी बन्सी जाधव(696,विजयी).तसेच भाजपा (विखे व कर्डिले गट)चे पाटील उदयसिंह सुभाष(590, पराभूत), कदम सत्यजित चंद्रशेखर(665,विजयी), निमसे शामराव शंकरराव(670, विजयी), आढाव संदीप लक्ष्मण(576, पराभूत), तांबे महेंद्र नारायण(598, पराभूत), पवार भगिरथ दगडू(531, पराभूत), कोळसे किरण वसंत(538, पराभूत), अपक्ष ज्ञानेश्‍वर हरिभाऊ पवार (28, पराभूत), राजेंद्र भाऊसाहेब पवार (16, पराभूत), महिला मतदार संघात महाविकास आघाडी (तनपुरे गट)चे सौ. शोभा सुभाष डुक्रे(709, विजयी), सौ. सुनीता रावसाहेब खेवरे(808, विजयी), भाजपा (विखे व कर्डिले गट)चे साबळे उज्वला राजेंद्र (600, पराभूत), मांगुडे उषा ज्ञानदेव(576, पराभूत), इतर मार्गास मतदार संघातून महाविकास आघाडी (तनपुरे गट)चे दत्तात्रय निवृत्ती शेळके(697, विजयी), भाजपा (विखे व कर्डिले गट)चे खुळे दत्तात्रय नारायण(579, पराभूत), तर अपक्ष सुर्यभान दत्तात्रय लांबे (58, पराभूत), वि.जा.भ.ज. मतदार संघातून महाविकास आघाडी (तनपुरे गट)चे रामदास परसराम बाचकर(763, विजयी), भाजपा(विखे, कर्डिले गट)चे बिडगर आशिष विठ्ठल(699, पराभूत), तसेच ग्रामपंचायत मतदार संघाच्या खुल्या प्रवर्गातून महाविकास आघाडी (तनपुरे गट) मंगेश जालिंदर गाडे(478, विजयी), श्रीमती शारदा किसन आढाव(458, विजयी), भाजपा(विखे, कर्डिले गट) चे भनगडे अमोल साहेबराव(311, पराभूत) व धसाळ विराज तान्हाजी(367, पराभूत), दुर्बल घटक मतदार संघातून महाविकास आघाडी (तनपुरे गट) चे गोरक्षनाथ तुकाराम पवार(443, विजयी), भाजपा (विखे, कर्डिले गट)चे बानकर सुरेश पंढरीनाथ(362, पराभूत), अनु. जा.ज मतदार संघातून महाविकास आघाडी (तनपुरे गट)चे मधुकर प्रभाकर पवार(466, विजयी), भाजपा (विखे, कर्डिले गट) चे डोळस नंदकुमार लक्ष्मण(338, पराभूत), व्यापारी मतदार संघातून महाविकास आघाडी (तनपुरे गट) चे चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ(308, विजयी) व सुरेश बन्सीलाल बाफना(312, विजयी), भाजपा (विखे कर्डिले गट) चे वालझाडे राजेंद्र सखाहरी(19, पराभूत), मेहेत्रे दिपक अरविंद(15, पराभूत), हमाल मापाडी मतदार संघातून महाविकास आघाडी (तनपुरे गट)चेमारूती रंगनाथ हारदे(171, विजयी), भाजपा (विखे, कर्डिले गट) तमनर शहाजी दादा(61, पराभूत).

निवडणूक निर्णय आधिकारी संदीप रूद्राक्ष यांनी निवडणूक घोषित केल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत गुलालाची मुक्त उधळण केली. महाविकास आघाडीचे नेतृत्व माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती अरुण तनपुरे, माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे यांनी केले. तर विरोधी भाजपा पुरस्कृत राहुरी तालुका विकास मंडळाचे नेतृत्व खा. डॉ. सुजय विखे पाटील व माजी आ. शिवाजीराव कर्डिले करीत होते.

गेल्या 18 वर्षात जो पारदशी कारभार केला. त्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. यापुढे मतदारांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, येत्या पाच बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न केले जातील. प्रचारा दरम्यान भावी काळात मतदारांना जो शब्द दिला तो पुर्ण करू. आमचे दोन शिलेदार बाद मता मुळे दोन व पाच अशा अत्यल्प मतांच्या फरकाने पराभूत झाले. सुतगिरणीच्या साडेतेरा एकर जागेवर खुला बाजार, जनावरांचा बाजार, कापसाचा मोंढा व युवा उद्योजकांसाठी अनेक योजना पुर्णत्वास नेऊ. विजय आम्ही नम्रपणे स्विकारला आहे. अशी प्रतिक्रिया सभापती अरूण तनपुरे यांनी व्यक्त करून सर्व मतदारांचे आभार मानले.

सोसायटी मतदार संघातील खुल्या प्रवर्गातील कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय आधिकार्‍यांकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज केल्याने फेर मतमोजणी करण्यात आली. यात भाजपाचे विजयी उमेदवार सत्यजित कदम यांचे अवघे दोन मते वाढली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com