राहुरी, अकोले व श्रीगोंदा तालुक्यांतील ‘राष्ट्रवादी’ची युवक कार्यकारणी बरखास्त

राहुरी, अकोले व श्रीगोंदा तालुक्यांतील ‘राष्ट्रवादी’ची युवक कार्यकारणी बरखास्त

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी, अकोले व श्रीगोंदा तालुक्याच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विद्यमान कार्यकारिणी त्वरित बरखास्त करण्यात आल्या असल्याचे पत्र राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी प्रसिध्द केले आहे.

पत्रात त्यांनी म्हटले की, येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पक्षातील नवीन सक्रिय व कार्यक्षम कार्यकर्त्यांना संघटना बांधणीसाठी पदाधिकारी नेमण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद आदी निवडणूक बांधणी करण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेवरून सध्या कार्यरत असलेल्या तालुकाध्यक्ष यांच्यासह कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. पत्राच्या प्रती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com