राहुरी कृषी विद्यापीठ व किसान कनेक्ट यांच्यात सामंजस्य करार

राहुरी कृषी विद्यापीठ व किसान कनेक्ट यांच्यात सामंजस्य करार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महात्मा फुले कृषी विद्यापीठ व येथील किसान कनेक्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या दरम्यान सामंजस्य करार संपन्न झाला. विद्यापीठाच्यावतीने संशोधन विभागाचे संचालक व वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. शरद गडाख यांनी तर किसान कनेक्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. यांच्यावतीने संस्थापक संचालक किशोर निर्मळ यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

सदरच्या करारात शेतकरी प्रशिक्षण, विस्तार सेवा, शेतमाल गुणवत्ता सुधार, फळे व भाजीपाला गुणवत्ता संशोधन व विकास, जनावरांचा चारा, शेती औजारे तंत्रज्ञान, जनावरांचे खाद्य टोटल मिक्स राशन (टीएमआर) टिकवणूक क्षमता संशोधन, कर्मचारी प्रशिक्षण, गायींचे प्रजनन व माहितीचे आदान-प्रदान या बाबींचा अंतर्भाव आहे.

फळे व भाजीपाला पिकवताना त्याच्या गुणवतेबद्दल शेतकर्‍यांकडून ज्या चुका होतात. त्या दुरुस्त करून गुणवत्ता पूर्ण फळे व भाजीपाला पिकविण्याची पद्धती विकसित करण्यावर भर देणार असल्याचे किशोर निर्मळ यांनी सांगितले. विद्यापीठाच्या यंत्रणेद्वारे माहिती, तंत्रज्ञान, संशोधन, शेतकरी प्रशिक्षण यासाठी किसान कनेक्टला मार्गदर्शन मिळणार असून विद्यापीठाच्या संकल्पनेतील आदर्श गावांमध्ये शेतकरी गट करून ते किसान कनेक्टला जोडून देण्यावर भर देणार असल्याचे डॉ. गडाख यांनी सांगितले.

विद्यापीठासोबतच्या या करारामुळे किसान कनेक्टला उत्तम गुणवत्ता असलेली फळे व भाजीपाला मिळण्यासाठी मोठे दालन उघडले असून शेतकर्‍यांच्या दृष्टीने ही मोठी संधी व उपलब्धी असल्याचे किसान कनेक्ट चे संस्थापक अध्यक्ष सारंगधर निर्मळ यांनी सांगितले.

किसान कनेक्ट मुळे नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांना त्यांनी पिकविलेल्या फळे व भाजीपाल्याला चांगला दार मिळत असून त्यांना यानिमित्ताने त्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी नवीन पर्याय निर्माण झाल्याचे किसन कनेक्टचे शेतमाल खरेदी विभागाचे प्रमुख मनीष मोरे यांनी सांगितले. किसन कनेक्टचे विषमुक्त अन्न या संकल्पनेला प्रतिसाद देत शतायुषी या नावाने सेंद्रिय फळे व भाजीपाला विक्री सुरु केली असल्याचे किसन कनेक्टचे कार्यकारी संचालक विवेक निर्मळ यांनी सांगितले. करारावर स्वाक्षर्‍या करताना विद्यापीठाचे डॉ. डी. के. कांबळे विभाग प्रमुख पशुसंवर्धन व दुग्धशास्र विभाग याच विभागाचे डॉ. डी. के. देवकर, संशोधन विभागाचे उपसंचालक डॉ. व्ही. जी. पोखरकर, डॉ. संजय तोडमल उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com