राहुरी विद्यापीठात अभियंत्याचे आंदोलन चिघळले

प्रशासकिय इमारतीच्या प्रवेशद्वारात ठिय्या
राहुरी विद्यापीठात अभियंत्याचे आंदोलन चिघळले

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी कृषी विद्यापीठ (Rahuri Agricultural University) येथे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलनाचा (Movement) नववा दिवस आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने आंदोलन कर्त्यांनी आज आंदोलन तिव्र करत विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारातीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन (Movement) केले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन व पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.

राहुरी विद्यापीठात अभियंत्याचे आंदोलन चिघळले
यूट्युबवर साईबाबांची बदनामी, स्वामीविरोधात गुन्हा

राहुरी कृषी अभियांत्रिकी (Rahuri Agricultural University) विद्यार्थ्यांचे नवव्या दिवशी ही धरणे आंदोलन सुरु असुन शेकडो विद्यार्थ्यांची तब्बेत खालावले आहे. तहसील प्रशासनाने अरोग्य विभागास कळवून देखील अरोग्य विभागाने या आंदोलकांची कोणतीही दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. नऊ दिवसात अरोग्य विभाग (Department of Health) व तहसील प्रशासनने कोणतीही दखल न घेतल्याने या विद्यार्थ्यांनी अंदोलनाचा पवित्रा बदलत आज विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारातीच्या मुख्य प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन केले. नंतर पोलीस प्रशासन (Police Administration) व तहसीलचे अधिकारी यांनी या ठिकाणी धाव घेतली.

राहुरी विद्यापीठात अभियंत्याचे आंदोलन चिघळले
गुन्हेगारांच्या शोधासाठी ‘क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम’

मात्र आरोग्य विभागाचे कोणतेही आधिकारी उपस्थित नव्हते. आम्ही गेली नऊ दिवसापासुन विद्यापीठाच्या प्रशासन भवना समोर धरणे धरून बसलो आहोत. मात्र, आमची कोणतीही दखल घेतली नाही. असा संतप्त सवाल अदोलनकर्त्यांनी केला. यावर राहुरी तहसील प्रशासनाने (Rahuri Tehsil Administration) कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही. राज्य सेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनी केवळ दोन तास अदोलन केले. त्यांची तात्काळ दखल घेतली. आम्ही गेली नऊ दिवसापासुन अंदोलन करत आहोत.

राहुरी विद्यापीठात अभियंत्याचे आंदोलन चिघळले
बोगस डॉक्टर पवारला चार दिवस पोलीस कोठडी

शासनाने आमचा आठरावा दिवस उगऊ देऊ नये. आमची शासनाने तात्काळ दखल घ्यावी. आम्हाला न्याय मिळावा, अशी आमची मागणी आहे, असे यावेळी अंदोलनकर्त्यानी सांगितले. विद्यार्थी चे आंदोलन चालू असल्यापासून शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करत आहोत व शासनाचे सचिव व उपसचिव यांना आज ही पत्रानी कळविले आहे विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लाहळे यांनी सांगीतले.

राहुरी विद्यापीठात अभियंत्याचे आंदोलन चिघळले
महिलेला फोन करून केले गैरकृत्य
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com