राहुरी खुर्दला अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहुरी खुर्दला अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेल्याची घटना 19 मे रोजी पहाटेच्या दरम्यान घडली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील एक 17 वर्षे 4 महिने वय असलेली मुलगी तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. दि. 19 मे रोजी पहाटे चार ते सात वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या घरातून अपहरण करून पळवून नेले. घरातील इतर लोक सकाळी उठल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

त्यांनी मुलीचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी तातडीने राहुरी पोलीस ठाणे गाठून हा प्रकार पोलिसांसमक्ष कथन केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा रजि. नं. व कलम - । 380/2021 भा. दं. वि. कलम- 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अमित राठोड हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com