गडाखांच्या पीए वरील गोळीबार प्रकरणातील शिरसाठला 5 दिवसांची पोलीस कोठडी

गडाखांच्या पीए वरील गोळीबार प्रकरणातील 
शिरसाठला 5 दिवसांची पोलीस कोठडी

सोनई |वार्ताहर| Sonai

मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर लोहगाव येथे झालेल्या गोळीबारातील आरोपींपैकी एका आरोपीला रविवारी गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून त्याला आज न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गडाखांच्या पीए वरील गोळीबार प्रकरणातील 
शिरसाठला 5 दिवसांची पोलीस कोठडी
मंत्री गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी एका आरोपीस अटक

जलसंधारण मंत्री शंकराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांना शुक्रवारी रात्री लोहगाव येथे पिस्तुलातून गोळ्या मारून जखमी केले होते. या घटनेतील चार आरोपी लगेच पसार झाले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार केली आहेत.

गडाखांच्या पीए वरील गोळीबार प्रकरणातील 
शिरसाठला 5 दिवसांची पोलीस कोठडी
मंत्री शंकरराव गडाखांसह मुलाच्या हत्येचं कारस्थान?

ही पथके पसार आरोपींच्या मागावर आहेत. आरोपींपैकी नितीन शिरसाठ याला शेवगावमधून गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी संध्याकाळी पकडून सोनई पोलिसांच्या ताब्यात दिले. सोनई पोलिसांनी त्याला काल सोमवारी न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

राजळे यांचा अद्याप जबाब नाही

जखमी राहुल राजळे यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात राहुल राजळे यांचा जबाब नोंदविण्यात आला नाही. ज्या वेळेस तो जबाब घेण्यात येईल त्यात आणखी माहिती पुढे येऊन याचा मुख्य सूत्रधार कोण आहे किंवा आणखी कुणाचा समावेश असेल याची नेवासा तालुक्यात मोठी चर्चा चालू आहे.

Related Stories

No stories found.