मंत्री गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी एका आरोपीस अटक

मंत्री गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी एका आरोपीस अटक

सोनई |वार्ताहर| Sonai

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांच्या स्वीय सहायकवर झालेल्या गोळीबार प्रकरणी (PA Firing Case) चार आरोपींपैकी एका आरोपीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) रविवारी संध्याकाळी शेवगाव (Shevgav) परिसरातून अटक (Arrested) केली असल्याची खात्रीलायक समजली आहे.

मंत्री शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे (PA Rahul Rajale) यांना शुक्रवारी रात्री लोहगाव (Lohgav) परिसरात पिस्तूलाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग करून जखमी (Injured) केले होते. या घटनेनंतर घटनेत वापरलेल्या चारचाकी वाहनासह सर्व चार आरोपी पसार झाले होते. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी गुन्हे शाखेचे अनिल कटके (LCB PI Anil Katake) यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी पाठवलेले होते.

आज रविवारी संध्याकाळी या घटनेतील आरोपी नितीन शिरसाठ हा शेवगाव परिसरात लपला असल्याची माहिती मिळाल्याने त्या परिसरातून त्यास अटक करण्यात आली आहे. इतर बबलू लोंढे, संतोष भिंगारदिवे व ऋषिकेश शेटे अजुनही फरार आहेत. या तीन आरोपीस अटक करण्यासाठी पथक कार्यरत असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com