राहुल भोसलेच्या टोळीविरोधात मोक्काची कारवाई

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती
राहुल भोसलेच्या टोळीविरोधात मोक्काची कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्‍या कुख्यात गुन्हेगार राहुल निवाश्या भोसले (Notorious criminal Rahul Niwashya Bhosale) टोळीतील पाच जणांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात (Mocca Action) आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी दिली.

राहूल निर्वाश्या भोसले (वय 22 वर्षे, रा. जुना सारोळा कासार, ता नगर), उरुस ज्ञानदेव चव्हाण (वय 33 वर्षे, रा. बुरुडगाव, ता.नगर ), दगू बडूद भोसले, (वय 27 वर्षे, रा. पडेगाव, ता. कोपरगाव,), निवाश्या चंदर ऊर्फ सिताराम भोसले (रा. सारोळा कासार, ता. नगर ) आणि पप्या मोतीलाल काळे (रा. पैठण, ता. पैठण) अशी मोक्काअंतर्गत कारवाई (Action under Mocca) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत.

त्यांचे विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले होते. नगर तालुक्यात 15 एप्रिल रोजी दरोड्याचा गुन्हा घडला (crime of robbery took place) होता. हा दरोडा राहुल भोसले यांच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याच्यासह टोळीतील ऊरूस चव्हाण व दगू भोसले या तिघांना पोलिसांनी अटक (Arrested) केली होती. अन्य दोघे पसार आहेत.

पाच दिवसांत मंजुरी

राहुल भोसले व त्याच्या टोळीने संघटीतपणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता नगर तालुका पोलिसांनी 28 जून 2021 रोजी (मोक्का) प्रस्ताव नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्या प्रस्तावाला महानिरीक्षकांनी 2 जुलै 2021 ला मंजुरी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com