पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची 'या' समितीवर निवड

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची 'या' समितीवर निवड
राहीबाई पोपेरे

अकोले |प्रतिनिधी| Akole

बीज माता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांची

राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकार कृषी मंत्रालया तर्फे स्थापन करण्यात आलेल्या प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट 1012 अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील निवड समितीवर त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

त्यांच्या निवडी संदर्भातील ई-मेल नुकताच प्राप्त झालेला आहे अशी माहिती बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी दिली. डॉक्टर टी. के . नागरत्ना रजिस्टार प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट कृषी विभाग, भारत सरकार यांनी या निवडीचे पत्र पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना पाठवलेले आहे.

या समिती मार्फत देशपातळीवर पारंपारिक बियाणे संवर्धन निर्मिती संगोपन व प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्ती ,संस्था ,मंडळ व समित्या ,यांची निवड राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी करण्यात येते. देशातील उत्कृष्ट बीज संवर्धक निवडण्याची जबाबदारी या समितीवर असते. देशपातळीवर दरवर्षी सुमारे 85 लाख रुपये किमतीचे पुरस्कार या समितीच्या माध्यमाने निवडण्यात आलेल्या शेतकरी, संस्था व व्यक्तींना दिले जातात. देशपातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरस्कारांचे वितरण व रक्कम याच विभागामार्फत केली जाते.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अकोले तालुक्याचे नाव चमकवलेल्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची या समितीवर निवड होणे म्हणजे तळागाळात काम करणाऱ्या गरीब हातांना मिळालेला न्याय म्हणता येईल. अशी भावना सामाजिक स्तरातून व्यक्त होत आहे. या अगोदरही राष्ट्रीय पातळीवर राहीबाई यांनी केलेल्या गावरान बीज संवर्धनाची दखल घेत भारत सरकारने त्यांना नारीशक्ती आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

त्यांच्या कार्याचे महत्व व आवश्यकता लक्षात घेऊन तसेच त्यांचे या विषयातील पारंपारिक ज्ञान व त्यावर असलेले प्रभुत्व यांचा विचार करून या समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com