बंद खोलीतील इंदोरीकर महाराज-विखे पाटील भेटीत काय शिजले?

आ.विखे पाटील म्हणाले, प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. परंतू महाराजांच्या कामाला लोकमान्यता असल्याने, त्यांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे भविष्यातील लढाईसाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.
बंद खोलीतील इंदोरीकर महाराज-विखे पाटील भेटीत काय शिजले?

अहमदनगर / आश्वी (वार्ताहर) ahmednagar -विरोधी पक्षातील नेत्यांनी इंदोरीकर महाराजांच्या indoriakar maharaj भेटीचा सिलसिला वाढला आहे. आज काँग्रेसधून भाजपात गेलेले माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil यांनी त्यांची भेट घेवून अर्धा तास चर्चा केली. ही सदीच्छा भेट होती, असे आ.विखे यांनी सांगीतले. पण बंद खोलीत अर्धा तास फक्त सदीच्छांची देवाण-घेवाण सुरू झाली की आणखी काही शिजले, यावरून नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. भेटीनंतर आ.विखे पाटील यांनी महाराजांच्या प्रकरणावरून सरकारवर टिका केली.

इंदोरीकर महाराज यांना ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून bhartiy janata party मैदानात उतरविण्याचा प्रयत्न झाला होता. महाराजांनी आजपर्यंत राजकारणापासून दूर राहणेच पसंद केले आहे. एव्हढेच नव्हे तर सर्वच पक्षीय नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. मात्र एका वादग्रस्त वक्तव्यामुळे उभे झालेले प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचल्यानंतर नेत्यांकडून त्यांच्या सदीच्छा भेटीचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यात आता भाजपाचे नेतेही दिसू लागल्याने चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आ.विखे पाटील यांनी केवळ चर्चेची देवाण-घेवाण केली की या भेटीमागे आणखी काही प्रयोजन होते, यावरून चर्चा आहे.

दरम्यान, भेटीनंतर ही सदीच्छा भेट होती, असे आ.विखे पाटील यांनी निक्षून सांगीतले. यावेळी ते म्हणाले, प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. परंतू महाराजांच्या कामाला लोकमान्यता असल्याने, त्यांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे भविष्यातील लढाईसाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.

आ.विखे पाटील म्हणाले की,महाराजांची सदीच्छा भेट घेण्यासारखी आलो होतो. त्यांच्याविषयी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत अधिक भाष्य करणार नाही. कायद्याला कायद्याचे काम करू द्यावे परंतू महाराजांनी संत विचारांनी सुरु केलेले प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे हेच सांगण्यासाठी आज त्यांची भेट घेतली असल्याचे आ.विखे म्हणाले.

वास्तविक महाराजांनी दिलगीरी व्यक्त करूनही त्यांच्या विरोधात सुरू झालेल्या कायदेशीर प्रक्रियेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उतर देताना विखे पाटील म्हणाले की सरकारने महाराजांबाबत सहानुभूती दाखवायला हवी होती,पण सध्या सरकारच असंवेदनशील झाले आहे. महाराजांनी संत विचारांनी राज्यात सुरू केलेल्या प्रबोधनाच्या कार्याला लोकमान्यता मिळाली आहे.त्यांनी सुरू केलेल्या कामाला अध्यात्मिक अधिष्ठान आहे. असेच काम त्यांनी भविष्यातही सुरू ठेवावे या कामाला आणि भविष्यातील लढाईसाठी त्यांना आमचे पाठबळ निश्चितच राहील असा दिलासा आपण त्यांना आपण दिला असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.

संगमनेर sangamner तालुक्यातील ओझर येथील निवासस्थानी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख यांची सदीच्छा भेट घेतली. या दोघांनी बंद खोलीत अर्धातास चर्चा केली. आ.विखे यांनी त्यांच्या कुटुंबियांसमवेत संवाद साधला. भगवतगीतेची प्रत देवून महाराजांनी आ.विखे पाटील यांचे स्वागत केले.

Related Stories

No stories found.