अहमदनगर|Ahmedagarराहाता बाजारातून मोबाईल चोरी करणार्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. .मोबीन फारूख शेख (वय- 28 रा. राहाता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 18 हजार रूपये किंमतीचा चोरीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.स्वप्निल नंदकिशोर सोनार (रा. रेणुकानगर ता. राहाता) हे 23 नोव्हेंबरला राहाता बाजारात गेले होते. तेथील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल लंपास केला होता. सोनार यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक तपास व गुप्त खबर्यामार्फत सदर चोरीचा मोबाईल मोबीन शेख याच्याकडे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी राहाता शहरातून मोबीन शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला आहे. निरीक्षक कटके यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, रवी घुंगासे, रोहिदास नवगिरे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.