राहत्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

राहत्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

राहाता |वार्ताहर| Rahata

साई बाबा संस्थानच्या भोजनायलयातील कंत्राटी कामगार असलेल्या तरुणाने राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सनी भाऊसाहेब गुंजाळ हा साईबाबा संस्थान येथे भोजन गृहात कंत्राटी म्हणून कामास होता.

गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून त्याचा अपघात होऊन त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा कामधंदा नसल्याने तो नैराश्यात राहात होता. त्याला 6 महिन्यांची मुलगी आहे. बुधवारी दुपारी 3 वाजे दरम्यान सनी गुंजाळ याने त्याच्या घरात पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयत सनी गुंजाळ याच्या मृतदेहाचे राहाता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार दिलीप तुपे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com