राहात्यातून महिलेसह दोन मुले बेपत्ता

राहात्यातून महिलेसह दोन मुले बेपत्ता

राहाता |प्रतिनिधी| Rahata

एका 32 वर्षीय महिलेसह तिची दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार या महिलेच्या पतीने राहाता पोलीस ठाण्यात दिली आहे.

राहाता येथील खंडोबा चौकातील आनंद उत्तमराव बारसे यांनी राहाता पोलिसांना दिलेल्या खबरीवरून त्यांची पत्नी सारिका आनंद बारसे (वय 32) हिच्यासह आलोक आनंद बारसे (वय 15), कार्तिक आनंद बारसे (वय 13) हे तिघे 7 मे 2021 रोजी सायंकाळी 7.30 ते 9.30 वाजता आपल्याला काहीही एक न सांगता राहात्या घरातून कुठेतरी निघून गेली. त्यांना नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही, अशा स्वरुपाची खबर राहाता पोलिसांकडे दिली आहे.

याप्रकरणी राहाता पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. या बेपत्ता प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेंबल दिलीप तुपे हे करत आहेत. सदरचे तिघे कुणाला मिळून आल्यास राहाता पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन राहाता पोलिसांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com