राहात्यातील विरभद्र महाराजांची यात्रा करोनामुळे यंदा रद्द

राहात्यातील विरभद्र महाराजांची यात्रा करोनामुळे यंदा रद्द

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शहरातील ग्रामदैवत विरभद्र महाराज व मायंबा या दोन्ही देवतांचा यात्रोत्सव करोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षीही रद्द करण्यात आला.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगाने दि. 25 व 26 एप्रिल रोजी राहाता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज व श्री मायंबा देवतेचा 150 वर्षाची परंपरा असलेला पारंपरिक यात्रा उत्सव करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी रद्द करण्याचा निर्णय राहाता येथील श्री वीरभद्र यात्रा उत्सव कमिटीने घेतला. गेल्यावर्षी सुद्धा करोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती.

सध्या करोना व्हायरसच्या प्रसारामुळे जगभरात भारत देशात या आजाराने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असलेला राहाता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज व श्री नवनाथ महाराज (मायंबा) या देवतेच्या यात्रा उत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. हा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे.

हा निर्णय घेण्यासाठी श्री वीरभद्र यात्रा उत्सव व देवालय कमिटी यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीमध्ये शहरातील भाविकांना व ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, सर्व भाविकांनी आपल्या घरातच वीरभद्र देवतेला प्रार्थना करून नैवेद्य आरती करावी. ज्या मानकर्‍यांकडे विशेष मान आहे. त्यांनी आपल्या घरातूनच देवतेच्या मुकुट, काठी, छत्री आदीची पूजा घरी करावी. मंदिरात पुजार्‍यांच्या मार्फत साध्या पद्धतीने पूजा संपन्न होईल.

मंदिर परिसरात कोणत्याही कारणाने कोणीही येऊन गर्दी करु नये. आपापल्या घरातूनच पुजा करून यात्रा उत्सव साजरा करून श्री विरभद्र देवालय उत्सव ट्रस्ट व शासनाला सहकार्य करावे. या निमित्ताने एक निश्चय करू व करोना व्हायरसला पळवून लावू असे आवाहन श्री विरभद्र देवालय ट्रस्ट अध्यक्ष सागर सदाफळ, अनिल बोठे तसेच सर्व सदस्य व गावकरी मंडळाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com