राहाता : करोना सेंटर समोरच पुन्हा भाजी विक्री सुरू

राहाता : करोना सेंटर समोरच पुन्हा भाजी विक्री सुरू

राहाता (प्रतिनिधी) - येथील चितळी रोडलगत कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून या कोविड सेंटरच्या समोरच भाजीपाला विक्रेते बसले असल्याने याकडे राहाता नगरपरिषदेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे त्यावश्यक सेवेतील भाजीबाजार हा सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु असून भाजीपाला विक्रेत्यांना चितळी रोडवरील घोलप मंगल कार्यालयाजवळील रोडवर बसण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र भाजीपाला विक्रेते मुख्य रस्त्यावर येऊन चक्क कोविड सेंटरच्या समोरच बसल्याने पुन्हा एकदा नगरपरिषदचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

नगरपरिषदेने या भाजीपाला विक्रेत्यांकडून अनेक वेळा दंड वसूल करूनही विक्रेते हे पालिका कर्मचार्‍यांना जुमानत नसल्याचे दिसते. पालिकेच्या कर्मचार्‍यांनी भाजीपाला विक्रेत्यांना या परिसरातून उठून दिल्यानंतर व कर्मचारी निघून गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जाऊन बसतात जर पालिकेच्या कर्माने कर्मचार्‍यांना विक्रेते दाद देत नसेल तर तहसीलदार, पोलीस प्रशासन यांनी भाजीपाला विक्रेत्यांना समज देण्याची गरज आहे.

चितळी रोड येथील कोविड सेंटरच्या समोरच भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असल्याने पुन्हा करोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण असून अनेक वेळा रुग्ण गेटवर उभे राहून भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांशी बोलत उभे राहतात.तसेच वेळोवेळी करोना बाधित रुग्णांना घेऊन रुग्णवाहिका ये-जा करत असते. या ठिकाणी भाजीपाला विक्री करणारे व भाजी खरेदीसाठी येणार्‍या महिला व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनू शकतो. या परिसरात मोठी लोकवस्ती असून मुख्य रस्त्यावर या बाजाराची गर्दी होते.

या रोडवर नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळीचा भाग असून अवजड वाहन व इतर वाहनांची वाहतुकीची कोंडी बरोबर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या सेंटरसमोर भाजीपाला विक्रेत्यांना बसून देऊ नये, अशी मागणी होत आहे.

राहाता नगरपालिकेकडून सतत कोविड सेंटरजवळील भाग सॅनिटाईज केला गेला पाहिजे. तसे होताना दिसत नाही. नव्याने आलेले मुख्याधिकारी यांनी लक्ष देणार का?

- रियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com