राहात्यात आज चक्काजाम आंदोलन

ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर
राहात्यात आज चक्काजाम आंदोलन
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

ओबीसींच्या (OBC) न्याय हक्कांसाठी भारतीय जनता पार्टी (BJP) व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharastra) एकाच दिवशी एकाच वेळी एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन (Movement) करण्यात येणार आहे. राहाता (Rahata) येथे विरभद्र मंदिराजवळ शनिवार दि. 26 जून रोजी सकाळी 11 वाजता हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर यांनी दिली.

राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushan Vikhe Patil) व भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर (Rajendra Gondakar) यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर राजेंद्र पिपाडा, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे, नगरसेवक धनंजय गाडेकर, डॉ. के. वाय. गाडेकर, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, साहेबराव निधाने, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, सचिन शिंदे, जिहा सरचिटणीस सुनील लोंढे, सचिन भैरवकर, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष स्वानंद रासने व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष गाडेकर यांनी म्हटले की, या नाकर्त्या आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे न्याय हक्काचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते मिळविण्यासाठी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राहाता येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी यावेळी भाजपा कार्यकर्ते, ओबीसी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व बंधू-भगिनींनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अवाहन जिल्हा पदाधिकारी अशोक दहिवळकर, दादासाहेब मेचे, राजेंद्र आव्हाड, भारत लोखंडे, दशरथ तुपे, गणेश वालझाडे, अरुण गाडेकर, गोकुळ गाडेकर, गणेश गोसावी, एकनाथ गाडेकर, आप्पासाहेब चव्हाण, खंडेराव कडलग, भानुदास गाडेकर, ज्ञानेश्वर दाभाडे, सोपान गाडेकर, रविशंकर जेजुरकर, दत्तात्रेय झोजे, सचिन मेहेत्रे, सुनील शिंदे, राजेंद्र बधे, गणेश मुर्तडक, रवींद्र पगारेे आदींनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com