चितळीत तरुणाची आत्महत्या; पोलीस कर्मचार्‍याने छळ केल्याचा संदेश व्हायरल

पोलीस दलात मोठी खळबळ
चितळीत तरुणाची आत्महत्या; पोलीस कर्मचार्‍याने छळ केल्याचा संदेश व्हायरल

श्रीरामपूर | प्रतिनिधी | Shrirampur

राहाता (Rahata) तालुक्यातील चितळी (Chitali) येथील एक 24 वर्षीय तरुणाने आपल्या घराजवळच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.

एका पोलीस (Police) कर्मचार्‍याने आपल्या माणसांद्वारे छळ केल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा संदेश या तरुणाने सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल केला आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडली आहे.

सुजीत बाबासाहेब चौधरी (Sujit Babasaheb Chaudhari) असे आत्महत्या केेलेल्या तरुणाचे नाव आहे. काल सायंकाळी सुजीत घरातून बाहेर गेला. उशिरापर्यंत तो परत आला नाही म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता घराजवळच्या विहीरीजवळ त्याचा मोबाईल (Mobile) आढळून आला. दरम्यान त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवरून एका पोलीस कर्मचार्‍याचे नाव घेवून हा कर्मचारी त्याच्या माणसांद्वारे आपला छळ करीत आहे. त्याच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा संदेश व्हायरल केला.

हा संदेश वाचल्यानंतर अनेकांनी चौकशी सुरु केली. असता त्याने घराजवळच्याच विहिरीत आत्महत्या केल्याचे लक्षात आले. दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र यश आले नाही.

आज शनिवारी सकाळी सुजितचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी पाठविलेल्या संदेशात पोलीस कर्मचार्‍याच्या नावाचा उल्लेख केल्याने पोलीस आता काय भूमिका घेतात? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com