राहात्यामध्ये प्रशासकीय कार्यालयांच्या भिंतीवर गुटख्याच्या पिचकाऱ्या

राहात्यामध्ये प्रशासकीय कार्यालयांच्या भिंतीवर गुटख्याच्या पिचकाऱ्या

राहाता ( तालुका प्रतिनिधी)

राहाता तालुका प्रशासकीय कार्यालय इमारतीत तहसील, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय आधी कार्यालय तीन मजली प्रशासकीय इमारतीमध्ये आहे.

या बहुमजली इमारतीच्या पायऱ्या व जिन्यांच्या भिंतींवर, कोपऱ्यामध्ये गुटका, तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुकून भिंती, धूम्रपान करून खराब करीत आहे. वरील पदार्थांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे तरीही यांची विक्री होत आहे.

तसेच कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यालयातील इमारतीच्या जिन्यातील कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहे. परंतु कॅमेरा निखालून तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.तहसीलच्या प्रशस्त इमारतीमध्ये आपले कामे घेऊन तालुक्यातून अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात.

पंचायत समितीच्या, भू मापन कार्यालय, कृषी अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य कार्यालय आधी कार्यालयाकडे जाण्यासाठी जिन्यातील पायऱ्यांचा वापर या ठिकाणी केला जातो. या ठिकाणाहून अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जात असतात कार्यालयकडे जाणाऱ्या जिन्यातील भिंतींवर या परिसरात कोणीही धूम्रपान अथवा या ठिकाणी थुकू नये असा बोर्ड सुद्धा असतानाही या परिसरातील जिन्याच्या भिंतीवर अनेक ठिकाणी पिचकऱ्या मारलेल्या आढळून येत आहे.

तसेच जिन्यातील भिंतीवर कॅमेरा सुद्धा असल्याने या कॅमेरामध्ये थूकणारे व धूम्रपान करण्याऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने कधी दंडात्मक कारवाई केली आहे का? या ठिकाणी लावलेले फलक व सी.सी.टि.व्ही.कॅमेरा हे शोभेचे वस्तू बनलेले आहे का? असाही सवाल नागरिक उपस्थित करत आहे. कार्यालयाच्या इमारतीमध्ये थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर तर काही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा धूम्रपान करताना दिसतात. या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com