राहात्यात शौचालयाला छत्रपतींचे नाव

संतप्त शिवसैनिकांसह उपनगराध्यक्ष पठारे यांनी नाव हटवत केला निषेध
राहात्यात शौचालयाला छत्रपतींचे नाव

राहाता |प्रतिनिधी| Rahata

येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी संकुलाच्या शौचालयाला छत्रपतींचे नाव दिल्याने शिवसैनिक संतप्त झाले. शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, भागवत लांडगे यांनी सदर ठिकाणी जाऊन ते नाव हटवत नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी संकुलाच्या शेजारी नगरपालिकेने बांधलेल्या शौचालयास छत्रपतींचे नाव दिल्याने शिवप्रेमी आणि शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून ही विकृत कल्पना ज्यांना सुचली त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम शिवप्रेमींचे आराध्य दैवत असून छत्रपतींचे नाव शौचालयास देणे हा फक्त विकृतपणा आहे. नगरपालिका प्रशासनाने ही घोडचूक केली आहे. सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचे काम न.पा. प्रशासनाने केले असून ही गंभीर बाब राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे पठारे यांनी सांगितले. ज्यांनी हा विकृतपणा केला असेल त्यांचेवर कारवाई व्हावी, अशी मागणी पठारे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com