तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला

वाकडी परिसरात खळबळ
तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळला

राहाता (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील वाकडी येथील पवार वस्ती येथील गट नंबर ६८२ मधील विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. वृषाली पंढरीनाथ पवार (वय २८) असे या तरुणीचे नाव आहे. ती दि. १४ सप्टेंबरपासून बेपत्ता होती.

वृषाली पंढरीनाथ पवार ही युवती दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ नंतर गवताला जाते म्हणून घराबाहेर पडली परंतु सायंकाळी ६ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिची शोधाशोध चालू केली. परंतु ती मिळून आली नाही. दरम्यान ती बेपत्ता झाल्याची ह श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली होती. परंतु १७ सप्टेंबर रोजी सकाळी रमेश सुकदेव पवार हे शेतात जात असताना गट नं ६८२ मधील काठोकाठ भरलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. याची माहिती स्थानिकांना तसेच श्रीरामपूर ग्रामीण तालुका पोलिसांना दिली. पोलीस पाटील अभंग हे घटनास्थळी हजर होत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी साखर कामगार हॉस्पिटल येथे नेण्यात आला.

दरम्यान प्रथमदर्शी समजलेल्या माहितीवरुन सदर तरुणीचे लग्न जमत नसल्यामुळे नैराश्यातून हा प्रकार झाल्याचे समजते. वृषालीचे आई-वडील हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. वृषालीही मोलमजुरी करत होती.

तिच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परीवार आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात नोंद करून पुढील तपास पो. नि. श्री. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉ. आडांगळे करत आहेत.

Related Stories

No stories found.