राहाता तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी पन्नासच्या पुढे

राहाता तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी पन्नासच्या पुढे

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

महसुल विभागाकडुन (Department of Revenue) जाहीर केलेल्या नजर पैसेवारीनुसार राहाता तालुक्यात (Rahata Taluka) सुकाळ असून प्रशासनाने सर्वच 61 गावांची नजर अंदाज पैसेवारी पन्नासच्या पुढे लावली आहे. पीक कापणी प्रयोगानंतर (Crop harvesting experiments) डिसेंबरमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे.

राज्यातील खरीप (Kharip) व रब्बीच्या (Rabbi) शेती पिकांच्या उत्पन्नाचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून महसूल विभागाच्या (Department of Revenue) माध्यमातून पैसेवारी जाहीर करत असते. या पैसेवारीवरून शासनाचे दुष्काळ (Drought), टंचाई (Scarcity) व पिक विमे (Crops Insurance), शासकीय मदत (Government Assistance), शेती कर्जाचे पुर्नगठण (Restructuring of agricultural credit) आदी बाबद धोरण ठरते. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 61 गावे असून या सर्वच गावांची नजर पैसेवारी प्रशासनाने पन्नास पैशाच्या पुढे लावली आहे. पावसाचे प्रमाण बर्‍यापैकी असल्याने प्रशासनाने हिरविगार पिके पाहुन अंदाज पैसेवारी पन्नासच्या पुढे लावली आहे.

यानंतर सुधारीत पैसेवारी आक्टोबरमध्ये तर पिक कापणी प्रयोग करून अंतिम पैसेवारी डिसेंबरमध्ये जाहीर होते. प्रशासनाकडुन सध्या उभ्या पिकांच्या पाहणीतुन पैसेवारी लावली असल्याने प्रत्यक्ष काढणीच्या वेळी पीक कापणी प्रयोगातुन अंतिम पैसेवारी कमी जास्त होवू शकते. पूर्वी राहाता तालुक्यातील गावांची 24 गावे खरीप व 36 गावे रब्बी अशी विभागणी होती. मात्र दोन वर्षापासुन सर्वच एकसष्ट गावांची खरीप पिकपाहणी केली जाते.

गेल्या वर्षी सर्वच गावांची अंतिम पैसेवारी पन्नासच्या पुढे असल्याने पूर्ण तालुका पिक विम्यापासुन वंचित होता मात्र पाउस चांगला असल्यामुळे दुबार पिके झाली होती. चालु वर्षी पाऊस जेमतेम आहे. वेळोवेळी पडणार्‍या पावसामुळे पिके हिरवीगार दिसत आहेत. यावर्षीही अंतिम पैसेवारी पन्नासच्या पुढे राहिल्यास तालुका पीक विम्यापासून (Crops Insurance) वंचित राहण्याची भिती शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com