राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

राहाता तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत विखे पाटील यांनी पुन्हा एकदा निर्वीवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

25 पैकी 23 ग्रामपंचायती विखे पाटलांच्या ताब्यात आल्या आहेत. लोणी खुर्द ग्रामपंचायतीत विखे गटाचा पराभव होऊन राष्ट्रवादीच्या जनार्दन घोगरे यांच्या गटाचा विजय झाला तर बाभळेश्वर ग्रामपंचायतीत रावसाहेब म्हस्के यांच्या ताब्यातील ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन विखे गटाच्या ताब्यात, त्याचबरोबर हनुमंतगाव ग्रामपंचायतही राष्ट्रवादीच्या ताब्यातून विखे गटाने हिसकावली.

राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 6 ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. 19 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणूक निकालात लोणी खुर्द व शिंगवे या दोन ग्रापंचायती वगळता 17 ग्रामपंचायतींवर विखे गटाने कमळ फुलविले. यात अस्तगाव ग्रामपंचायत, नांदूर, रामपूरवाडी, एकरुखे, ममदापूर, जळगाव, आडगांव बु., गोगलगाव, पाथरे बु., रांजणगाव खु., केलवड, हसनापूर, चंद्रापूर, हनुमंतगाव, बाभळेश्वर, पिंपळवाडी या ग्रामपंचायतींत विखे पाटील यांच्याच दोन गटांत लढत होऊन सत्ता कायम राखण्यात यश मिळाले.

शिंगवे ग्रामपंचायतीत विखे गट व आ. आशुतोष काळे गटाची युती असताना माजी आ. स्नेहलता कोल्हे गटाने 8 जागा जिंकून ग्रामपंचायत ताब्यात घेत येथे सत्तांतर घडविले. लोणी खुर्द येथील ग्रामपंचायतीत 20 वर्षानंतर सत्तांतर झाले. विखे गटाच्या ताब्यातील ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे जनार्दन घोगरे यांच्या गटाने 11 जागा जिंकून सत्ता ताब्यात घेतली तर विखे गटाला अवघ्या सहा जागा मिळाल्या.

बाभळेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब म्हस्के यांच्या गटाचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीत विखे गटाने 14 जागा जिंकून सत्ता खेचून आणली. म्हस्के गटाला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या अनेक वर्षांपासून म्हस्के गटाचे या ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते तर राष्ट्रवादीच्या भास्करराव फणसे गटाच्या 10 वर्षांपासून ताब्यात असलेली हनुमंतगाव ग्रामपंचायतीत विखे गटाचे अशोक घोलप यांच्या गटाने 11 जागा घेऊन सत्ता काबीज केली. फणसे गटाला एकही जागा राखता आली नाही.

या ठिकाणी झाले सत्तांतर

विखे यांच्याच दोन गटांतील लढती होऊन सत्ता बदल झाले यात मोठ्या चुरशीच्या ठरलेल्या लढतीत पिंपळवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतरण झाले असून विद्यमान सरपंच जालिंदर तुरकणे गटाला 5 जागा मिळाल्या तर माजी पंचायत समिती सभापती दीपक तुरकणे यांच्या गटाने 6 जागा जिंकून सत्ता ताब्यात घेतली.

एकरुखे ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच देवेंद्र भवर गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या तर जालिंदर गाढवे व दिलीप सातव गटाने 9 जागा जिंकून सत्ता काबीज केली. जळगाव ग्रामपंचायतीत कोपरगावच्या माजी आ. कोल्हे व गंगाधर चौधरी गटाला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले यात विखे गट व कोपरगावचे आ. काळे गटाला 8 जागा मिळवून सत्ता ताब्यात घेतली.

आडगाव ग्रामपंचायतीत गेली 20 वर्षे सत्ता कोंडीराम शेळके गटाच्या ताब्यात होती यावेळी त्यांच्या गटाला अवघ्या 4 जागा मिळाल्या तर भीमराज शेळके गटाने 7 जागा जिंकून सत्ता काबीज केली. केलवड ग्रामपंचायतीत सुभाष पाटील गमे यांच्या सत्ताधारी गटाला अवघ्या 3 जागा मिळाल्या तर पी. डी. गमे यांच्या गटाने 9 जागा जिंकून सत्तांतर घडविले. रांजणगाव खुर्द ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून सोपानराव कासार गटाने 11 जागा जिंकल्या तर नितीन गाढवे गटाला 2 जागा तिसरा गट दिलीप गाढवे यांच्या गटाला खातेही खोलता आले नाही.

राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतीत विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.

आडगाव बु.- वसंत शेळके, आशाबाई वराडे, हिराबाई लहामगे, अशोक लहामगे, भिमराज शेळके, शारदा सावळे, संजय शेळके, पुनम बर्डे, सुरेखा शेळके. गोगलगाव- दीपक मगर, अनिता तनपुरे, भाऊसाहेब खाडे, मच्छिंद्र गायकर, ज्योती सातकर, अनिल चौधरी, कुसूम गुजर, मंदाबाई मुसळे, प्रदीप दुशिंग, सुनंदा मगर, राधिका गुळवे.

रामपुरवाडी- रवींद्र माळी, बाळासाहेब भोरकडे, मनीषा जाधव, प्रदीप उगले, शोभा जगताप, लहानबाई सांबरे, विनोद वडणे, मिराबाई शिंदे, संदीप सुरडकर ,बेबी पवार, मंदाबाई काळे.

पाथरे बुद्रुक- उमेश घोलप, संगीता कदम, शाहीना शेख, संतोष पिंगळे, सागर कडू, पुष्पा कडू, दत्तात्रय कडू, रुपाली कडू, विजय कदम, रोहिणी कदम, परीगा कडू.

पिंपळवाडी - लक्ष्मण भागवत, सुनीता तुरकणे, रूपाली धरम, बाळासाहेब पवार, रामनाथ तुरकणे, अनिता चव्हाण, जगन्नाथ पगारे, विक्रम तुरकणे, रुपाली तुरकणे, संगीता खरात, हर्षदा वाकचौरे.

जळगाव - पंडित चौधरी, उषाताई आदमने, कल्पना चौधरी, अरुण गायकवाड, शिवाजी एलम, पुष्पा औताडे, दिलीप चौधरी, जया चौधरी, राजेंद्र साळुंके, श्रद्धा चौधरी, सुनिता चौधरी.

ममदापूर - रवींद्र केसकर, अनिता कदम, सुप्रिया रोकडे,संतोष शेवते दिपाली भालेराव, सागर माळी, सविता कळमकर, विजय जवरे, लतीफ शेख, सना पटेल, अमोल म्हसे, ज्योती नारळे, रागिनी उंडे.

लोणी खुर्द - शरद आहेर, संगीता तुपे, सुनिता कोरडे, जनार्दन घोगरे, अलका राऊत, अर्चना आहेर, प्रदीप ब्राह्मणे, आशा आहेर, मायकल ब्राह्मणे, विलास घोगरे, ललित आहेर, किरण आहेर, ज्योती आहेर, रूपाली घोगरे, रोहिदास बोरसे, मंगल बारसे. नांदूर - प्रीतम गोरे, दीपक घोरपडे, सविता आभाळे, सुदर्शन पारखे, स्वाती सोडणार, लता यादव, भास्कर गोरे, उर्मिला गोरे, अर्जुन गोरे, रोहिणी बोधक, विजया माळी. चंद्रापूर - प्रदीप माळी, संगीता नवघरे, दिपाली तांबे, अण्णासाहेब पारधे, रेखा गवळी, शहाजी घुले, प्रियंका तांबे.केलवड- विशाल वाघे, अंजली सोनवणे, हरी गायकवाड, एकनाथ रजपुत, उषा राऊत, चांगदेव कांदळकर, संगिता कांदळकर, सुनिता सुरेश गमे, अविनाश गमे, सुनिता रामनाथ गमे, अनिता गमे, गणेश घोरपडे, अलका गमे.