राहाता तालुक्यात युरियाचा तुटवडा

राहाता तालुक्यात युरियाचा तुटवडा

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

पेरणी लायक पाऊस झाला, पेरलेले चांगले उगवून आले, पुन्हा चांगला पाऊस झाला, आता पिकांना युरियाची गरज निर्माण झाली. सर्वजण युरिया युरिया करत असल्याने युरियाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

उशीरा का होईना फार मुसधार जरी नसला तरी भिज पावसाने खरीपातील पिके तरारुन उतरली आहेत. जे पेरले ते उगवले, त्यांना आता त्या पिकांना युरिया टाकावी या उद्देशाने शेतकरी सहकारी सोसायट्या अथवा विक्रेते यांच्या कडे धाव घेत आहेत. परंतु तेथे वरुनच युरिया कमी येत असल्याचे सांगुन एक अथवा दोन युरियाच्या गोण्या दिल्या जातात. विक्रेत्यांकडे जेवढ्या आहेत त्या दिल्या जातात. पुन्हा लोड येईल त्यावेळी देवु असे सागितले जाते. हे चित्र संपुर्ण राहाता तालुक्याचे आहे.

युरियाची टंचाई गेल्या आठवडाभरापासुन जाणवत आहे. परंतु तालुका कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकरी या विभागावर नाराज आहेत. शेतकर्‍यांची मागणी वाढलेली असताने युरियाची टंचाई जाणवत आहे. एकतर उशीराने पाऊस झाला, पेरण्याही उशीराने झाल्या. आता उगवून आलेली पिके जोमदार यावीत म्हणुन शेतकरी रासायनिक खतांकडे वळतो. परंतु ऐन खते टाकण्याच्या मोसमातच युरिया ची टंचाई जाणवते यामुळे शेतकर्‍यांचा हिरमोड होत आहे. दोनशे टन मागीतले की 15 टन देतात, असे एका संस्थेच्या पदाधिकार्‍याने सांगितले.

कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या हिताचे धोरण म्हणून पेरणी क्षेत्राप्रमाणे प्रत्येक शेतकर्‍यास युरिया उपलब्ध करून द्यावी अशी प्रतिक्रिया युरियाच्या तुटवडा संदर्भात बोलताना राहाता येथील शेतकरी उत्तम कारभारी गाडेकर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com