राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी पार पडल्या आहेत. या निवडीमध्ये 13 महिलांना तर 12 पुरुषांना गावचे सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे.

सरपंच व उपसरपंच पदाच्या गाव निहाय झालेल्या निवडी पुढील प्रमाणे आहेत. चंद्रपूर- अण्णासाहेब पारधे (सरपंच), दिपाली तांबे (उपसरपंच). रांजणगाव खुर्द- सुनीता कासार (सरपंच), नीलिमा गाढवे (उपसरपंच). कोल्हार बुद्रुक- निवेदीता बोरुडे (सरपंच), सविता खर्डे (उपसरपंच). तिसगाव- आशा घुले (सरपंच), मीनाताई कडू (उपसरपंच). सावळीविहीर खुर्द- अशोक जमधडे (सरपंच), सपना वर्पे (उपसरपंच). लोणी बुद्रुक- कल्पना मैड (सरपंच), गणेश विखे (उपसरपंच). अस्तगाव- नवनाथ नळे (सरपंच), गायत्री जेजुरकर (उपसरपंच). एकरूखे- जितेंद्र गाढवे (सरपंच), शांताबाई सातव (उपसरपंच). ममदापूर- अनिता कदम (सरपंच), दिपाली भालेराव (उपसरपंच).

रामपुरवाडी- संदीप सुरडकर (सरपंच), मंदा काळे (उपसरपंच). जळगाव- शिवाजी एलम (सरपंच), कल्पना चौधरी (उपसरपंच). गोगलगाव भाऊसाहेब खाडे (सरपंच), अनिल चौधरी (उपसरपंच). भगवतीपूर- दत्तू राजभोज (सरपंच), प्रकाश खर्डे (उपसरपंच). आडगाव बुद्रुक- पुनम बर्डे (सरपंच), अशोक लहामगे (उपसरपंच). नांदूर- प्रीतम गोरे (सरपंच), सुदर्शन पारखे (उपसरपंच). पिंपळवाडी- रामनाथ तुरकणे (सरपंच), सुनीता तुरकणे (उपसरपंच). केलवड- संगीता कांदळकर (सरपंच), विशाल वाघे (उपसरपंच). वाळकी- सोनम शेख (सरपंच), राजेंद्र दत्तात्रय विखे (उपसरपंच). हनुमंतगाव- मनीषा माळी (सरपंच), प्राजक्ता अनाप (उपसरपंच). शिंगवे- अनिता बाभूळके (सरपंच), प्रशांत काळवाघे (उपसरपंच). पाथरे बुद्रुक- उमेश घोलप (सरपंच), शाहिना अरिफ शेख (उपसरपंच). पिंपरी लोकाई- लक्ष्मण सोनवणे (सरपंच), भामाबाई गायकवाड (उपसरपंच). लोणी खुर्द- जनार्धन चंद्रभान घोगरे (सरपंच), अर्चना अनिल आहेर (उपसरपंच). बाभळेश्वर- विमल म्हस्के (सरपंच), अमृता मोकाशी (उपसरपंच). हसनापूर- छाया बारसे (सरपंच), अफजल शौकत पटेल (उपसरपंच) याप्रमाणे नूतन सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी पार पडल्या असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.