राहाता तालुक्यात रब्बीचे 32 हजार 402 हेक्टर क्षेत्रावर नियोजन
File Photo

राहाता तालुक्यात रब्बीचे 32 हजार 402 हेक्टर क्षेत्रावर नियोजन

राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) रब्बीचे क्षेत्र 32 हजार 402 हेक्टर आहे. या क्षेत्रावर रब्बी हंगामातील विविध पिकांचे नियोजन (Crop Planning) करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली.

रब्बीच्या नियोजनात सर्वाधिक क्षेत्र हरबरा पिकासाठी (Gram Crops) आहे. 32 हजार 402 हेक्टर पैकी हरबरा पिकासाठी (Gram Crops) 12 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. गहु 10.5 हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. रब्बी ज्वारीचे 400 ते 150 हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) पुर्वभागातील रामपुरवाडी, नपावाडी भागात रब्बी ज्वारीचे पीक घेतले जाते. चारा पिकासाठी मकाची (Corn) 8 हजार हेक्टरवर पेरणी होते. कांद्याची (Onion) लागवडही 2.5 ते 3 हजार हेक्टरवर होते.

हरबरा (Gram), गहु (Wheat), मका (Corn) व अन्य चारा पिकांसाठी लागणार्‍या खतांचे नियोजनही करण्यात आले आहे. युरिया, डिएपी, मिक्स खते व अन्य लागणार्‍या खतांचे नियोजन करण्यात आले आहे. या खतांची शेतकर्‍यांना टंचाई भासणार नाही. हरभरा, गहू याच्या बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात खरीपाचे 38 हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजेच 17.5 हजार हेक्टर वर सोयाबिन उभे आहे.

यंदा 533 मिमी पाऊस पडला. सरासरी पाऊस 499 मिमी इतका आहे. 108 टक्के पाऊस कमीच आहे. दोन वर्षापूर्वी सन 2019 च्या आक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांना 18 कोटी रुपयांचे अनुदान तालुक्यासाठी मिळाले होते. तर विम्याची 32.5 कोटी रुपये इतकी रक्कम तालुक्याला मिळाली होती.

रब्बी हंगामातील पिकांचा व अंबिये बहार मधील फळबागांचा विमा शेतकर्‍यांनी उतरावा. राहाता तालुक्यात 450 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे. द्राक्षे पिकांच्या विम्याची मुदत 15 आक्टोबर असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी द्राक्षे पिकाचा विमा उतरावा. डाळींबाच्या विम्याची मुदत 14 जानेवारी 2022 पर्यंत आहे.

- बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी

Related Stories

No stories found.