राहाता तालुक्यात ऑक्सिजन निर्मितीस प्रारंभ

राहाता तालुक्यात ऑक्सिजन निर्मितीस प्रारंभ

राहाता | Rahata

लोहारे येथील साई गॅस ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती सुरू झाली आहे. याबाबतची माहिती माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली.

प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी प्रशासकीय बाबी काही दिवसांपूर्वी पाठपुरावा करून सोडविल्या. भाऊराव पोकळे यांनी हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या लिक्विडची उपलब्धता करून दिली.

या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीला सुरूवात झाल्याने नगर जिल्ह्यातील नागरीकांना या संकटकालीन परिस्थितीत दिलासा मिळाला आहे आणि या संकटकाळात हे समाजोपयोगी काम करता आले याचे मोठे समाधान देखील लाभले आहे, असे आ.विखे पाटील यांनी म्हटले आहे.

1 मे रोजी त्यांनी या प्रकल्पाला भेट देवून ऑक्सिजन निर्मितीचा शुभारंभ केला. याप्रसंगी शिर्डीचे प्रांताधिकारी श्री. गोविंद शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com