राहाता तालुक्यातील 46 गावांत सक्रीय रुग्ण नाहीत

राहाता तालुक्यातील 46 गावांत सक्रीय रुग्ण नाहीत

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील साठ गावांपैकी 46 गावांमध्ये करोनाची सक्रीय रुग्ण संख्या शुन्यावर आली असल्याने तालुकावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरीत पंधरा गावांमध्येही केवळ एक अंकी सक्रीय रुग्ण संख्या आहे. तसेच संपूर्ण तालुक्यातील सक्रीय रुग्णसंख्याही केवळ 22 वर आली आहे.

माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुका करोना मुक्तिकडे वाटचाल करीत आहेत. आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, पंचायत समिती व गावामधील स्थानिक प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे राहाता तालुक्यातील 46 गावांमध्ये दि. 21 डिसेंबरच्या अहवालानुसार एकही रुग्ण नाही तर उर्वरीत पंधरा गावांमध्ये केवळ एक अंकी सक्रीय रुग्ण आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांत करोनाचा प्रादूर्भाव ओसरत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या राहाता, शिर्डी, लोणी खुर्द, लोणी बु या गावांमध्येही रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. 21 डिसेंबरच्या अहवालानुसार तालुक्यातील एकूण सक्रीय रुग्ण संख्या 22 आहे. यामध्ये लोणी खुर्द 04, शिर्डीमध्ये 05 सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन सापडणार्‍या रुग्णांमध्ये घट आल्याने सक्रीय रुग्ण संख्या असणार्‍या गावांची संख्याही दर आठवड्यात कमी होत आहे. लसीकरण, प्रशासकीय प्रयत्न, नागरिकांची सजगता यामुळे तालुक्यात रुग्ण संख्या नियत्रंणात असल्याचे दिलासादायक चित्र आहे. बर्‍याच कालावधीनंतर शाळाही सुरळीत सुरू झाल्या आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी करोनाचे नियम पाळण्याचे व प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे अवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

बारा गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण

तालुक्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एलमवाडी, तरकसवाडी, चोळकेवाडी, धनगरवाडी, नांदुर खु, एकरूखे, हसनापुर, डोर्‍हाळे, नादुर्खी खुर्द, सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर बुद्रुक, नादुर्खी खुर्द या बारा गांवामध्ये शंभर टक्के लसीकरण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com