राहाता तालुक्यातील 4 हजार नियमीत शेतकर्‍यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

राहाता तालुक्यातील 4 हजार नियमीत शेतकर्‍यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांसाठी 50 हजारांपर्यत प्रोत्साहन अनुदान योजनेची राज्य सरकारने घोषणा केली आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली असून जिल्हा बँक व सेवा सोसायट्यांच्या अखत्यारीतील राहाता तालुक्यातील 4 हजार 300 पात्र शेतकर्‍यांची माहिती बँकेने तयार केली आहे.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून नियमीत कर्ज भरणार्‍या नियमीत शेतकर्‍यांना भरणा केलेल्या कर्ज रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. गेल्या 11 मार्च रोजीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी योजनेची घोषणा करून 10 हजार कोटीची तरतूदही केली आहे. यासाठी जिल्हा बँकेने परिपत्रक काढीत 2017-18, 2018-19 व 2019-20 चा तिनही वर्षात पीक कर्जाची उचल करून विहीत मुदतीत नियमित परतफेड केलेली आहे. अशा शेतकर्‍यांची तीन वर्षाची कर्ज उचल व भरणा माहिती, आधार नंबर सेव्हींग खाते आदी माहिती मागविण्यात आलेली होती.

त्यानुसार राहाता तालुक्यातील जिल्हा बँकेच्या अखत्यारीत येणार्‍या सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात आली असून तालुक्यात जवळपास 4 हजार 300 पात्र शेतकर्‍यांची माहिती जिल्हा बँकेने तयार केली आहे. जून अखेर या रकमा शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होतील, असा अंदाज व्यक्त होत असून आधार लिंक असल्याने शासकीय नोकर, आयकर भरणारी व्यक्ती यातून वगळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन लाखांपर्यंतची थकीत शेतकर्‍यांची कर्जमाफी योजना पुर्ण झाल्यावर नियमीत कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी पन्नास हजांराच्या प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com