
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यात (Rahata Taluka) कृषी विभागाने (Department of Agriculture) खरीप पिकांचे (Kharip Crops) 39 हजार 485 हेक्टरवर नियोजन केले आहे. खतांची उपलब्धता असल्याने खतांची टंचाईही (Fertilizer Scarcity) भासणार नसल्याचे तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले.
तालुक्यात खरीप हंगामात (Kharif Season) सोयाबीन (Soybean) हे खरीपातील मुख्य पीक बनल्याने सोयाबीनचे (Soybean) 18 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या करण्याचे नियोजन आहे. मकाच्या (Corn) लागवडीखाली 10 हजार 500 हेक्टर क्षेत्र असणार आहे. कपाशी 1700 हेक्टर, बाजरी 1550 हेक्टर तर चारा पिके 6900 हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. तसेच भुईमुग व इतर पिकांचे नियोजन आहे.
पेरण्यांसाठी बियाणांचेही नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीनची 18500 हेक्टरवर पेरणी करण्यात करण्यात येणार असल्याने यासाठी 13 हजार 875 क्विंटल सोयाबीनचे (Soybean) बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. मका पिकासाठी (Corn Crops) 2100 क्विंटल, बाजरीसाठी 62 क्विंटल, कपाशी (Cotton) 42 क्विंटल, चारा पिकांसाठी 1380 क्विंटल असे नियोजन करण्यात आले आहे.
काही शेतकर्यांकडे घरचे सोयाबीनचे बियाणे आहे. या बियाणांची उगवण क्षमता कृषी सहाय्यकांच्या मार्फत तपासण्यात आली आहे. 450 शेतकर्यांच्या बियाणे उगवण क्षमता तपासण्यात आल्या होत्या. यासाठी कृषी सहायकांनी उगवण क्षमता प्रात्यक्षिक घेतले. विक्रीसाठीही तालुक्यात मुबलक बियाणे आहे.
तालुक्यात खरीप हंगामासाठी खतेही उपलब्ध आहेत. खरीप हंगाम 2022-23 साठी 12 हजार 852 मेट्रीक टन रासायनिक खतांचे नियोजन आहे. त्यातील 10 हजार 520 मेट्रीक टन खतांचे पुरवठा होणार आहे. युरिया 3706 मेट्रीक टन, डीएपी 1184 मेट्रीक टन, एसएसपी 1745 मेट्रीक टन, एमओपी 406 मेट्रीक टन, संयुक्त खते 3479 मेट्रीक टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी सद्यस्थितीला कृषी सेवा केंद्रात शिल्लक असलेली खते अशी- युरिया 1446 मेट्रीक टन, डीएपी 377 मेट्रीक टन, डीएपी 72 मेट्रीक टन, एसएसपी 865 मेट्रीक टन, मिश्र खते 1038 मेट्रीक टन खते असे एकूण 3797 मेट्रीक टन खते उपलब्ध आहेत. खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने खतांची टंचाई भासणार नाही.
शेतकर्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करु नये, 100 मिमी पाऊस पडल्यावरच पेरणी करावी. राहाता तालुक्यात रासायनिक खते व बियाणे यांची पुरेशी उपलब्धता असून खरीप हंगाम 2022 मध्ये सोयाबीन मका, कपाशी यांच्या संभाव्य वाढणार्या क्षेत्रानुसार बियाणे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच सोयाबीन बियाणे पेरणी करावी.
नुकतीच माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरीप हंगामातील बियाणे व खते नियोजना संदर्भात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी तालुक्यात खतांची व बियाणांची टंचाई भासणार नाहीत, काळा बाजार होणार नाही याबाबत कृषी विभागाला सूचना दिले होत्या.
कृषी सेवा केंद्र चालकांनी कृषी सेवा केंद्रात किती खते व बियाणे उपलब्ध आहेत, त्याचा साठा व भाव फलक नियमित आपल्या दुकानासमोर प्रसिध्द करावा. भाव फलकावर लावावा. किती साठा शिल्लक हे लावावे. बियाणे व खते यांची जादा दराने विक्री केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्र चालक यांचेवर कायदेशीर करण्यात येईल.
- बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी