राहाता तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू

राहाता तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये राहाता तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत ऑक्टोबरमध्ये संपत असल्याने या मुदतीच्या आत निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील विविध ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये राहाता तालुक्यातील नादुर्खी खुर्द, नादुर्खी बुद्रुक, राजुरी, डोर्‍हाळे, साकुरी, खडकेवाके, रांजणखोल, लोहगाव, आडगाव खु,, सावळीवीहीर बु, नपावाडी, निघोज या बारा ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे.

त्यामुळे या सर्व गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांकामी वार्ड निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. या सोडतीच्या अंतिम रचनेनंतर वार्ड निहाय मतदार याद्या व प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होणार आहे. राजकारणात ग्रामपंचायत ही पहिली पायरी समजली जाते.

ग्रामीण राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व गावपातळीवर पकड मजबूत करण्यासाठी गाव पुढार्‍यांसह तालुक्यातील लोकप्रतिनिधीकडूनही या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहिले जाते. ऐन उन्हाळ्यात सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांचा धुराळा उडाल्यावर भर पावसाळ्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या बरसातीने ग्रामीण भागातील राजकारण भिजून निघणार आहे.

लोकनियुक्त सरपंच राज संपणार

राहाता तालुक्यातील या बारा गावांमधील ग्रामपंचायतीमध्ये सध्या जनतेतून निवडून आलेले लोकनियुक्त सरपंच कार्यरत आहेत.मात्र आघाडी सरकारने राज्यातील सत्तेत आल्यावर थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पध्दत बदलल्यामुळे होऊ घातलेल्या या गावांमध्ये निवडणुकीनंतर सदस्यातून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे पाच वर्षांनंतर सदस्यांचेही मोल वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com