राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला

तीन ठिकाणी पोटनिवडणुका
राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक जाहीर झाल्याने त्या गावांमध्ये जोरदार राजकिय हालचाली सुरू झाल्या आहेत. सरपंच पदासाठी आरक्षण असल्याने यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

राहाता तालुक्यातील दहेगाव कोर्‍हाळे, कोर्‍हाळे, निमगाव कोर्‍हाळे, धनगरवाडी, दुर्गापूर, वाकडी, दाढ बु., पिंपरी निर्मळ, कनकुरी, रुई, पुणतांबा-रस्तापूर, चितळी या 12 गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जानेवारी ते ऑगस्ट 2023 या दरम्यान या ग्रामपंचायतींची मुदत संपणार्‍या त्या 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत. या 12 ग्रामपंचायती बरोबरच पिंपळवाडी, केलवड येथील प्रत्येकी एक सदस्य पदाच्या व आडगाव खुर्दच्या सरपंचपदाची निवडणूक होत आहे.

राहाता तालुक्यातील सर्वात मोठ्या वाकडी, पुणतांबा व दाढ बु. या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या तीनही ग्रामपंचायतींचे प्रत्येकी सहा प्रभाग आहेत. त्यातून 17 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. वाकडी ग्रामपंचायतीसाठी 11,930 मतदार आहेत. पुणतांबा ग्रामपंचायतीसाठी 14,985 मतदार आहेत. दाढ बुद्रुकसाठी 4622 मतदार आहेत.

या ग्रामपंचायतीच्या खालोखाल रुई, चितळी, पिंपरी निर्मळ, कोर्‍हाळे, निमगाव कोर्‍हाळे या ग्रामपंचायती आहेत. पाच ही ग्रामपंचायतीच्या 5 प्रभागातून प्रत्येकी 13 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. पिंपरी निर्मळ ग्रामंपचायतीसाठी 5,958 मतदार आहेत. रुई ग्रामपंचायतीसाठी 5,211 मतदार आहेत. चितळीसाठी 4,609 मतदार आहेत. कोर्‍हाळे येथे 4,798 मतदार आहेत. निमगाव कोर्‍हाळे येथे 5,978 मतदार आहेत.

दहेगाव कोर्‍हाळे, धनगरवाडी, दुर्गापूर, कनकुरी ग्रामपंचायतींसाठी 3 प्रभाग आहेत. धनगरवाडी ग्रामपंचायतीसाठी 852 मतदार आहेत. तेथे तीन प्रभागांतून 7 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. दहेगाव कोर्‍हाळे येथे 3 प्रभागांतून 9 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. तेथे 2,077 मतदार आहेत. दुर्गापूर येथे 3 प्रभागांतून 9 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. तेथे 2,641 मतदार आहेत. कनकुरी येथे 3 प्रभागांतून 9 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. तेथे 1,720 मतदार आहेत.

या ग्रामपंचायतींच्या व्यतिरिक्त तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. पिंपळवाडी येथे 1 जागा, केलवड येथे 1 जागा तर आडगाव खुर्दला सरपंच पदाची निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम !

उमेदवारी अर्ज दाखल करता येतील- 16 ऑक्टोबर ते 20 आक्टोबर वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वा. उमेदवारी अर्जाची छाननी- 23 ऑक्टोबर 2023 - सकाळी 11 वाजता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक- दि. 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवार अंतिम यादी प्रसिध्दी- 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेनंतर. आवश्यक असल्यास मतदान - दि. 5 नोव्हेंबर रविवार सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपयर्ंंत. मतमोजणी - 6 नोव्हेंबर 2023 रोजी.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com