राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी 70.68 टक्के मतदान

राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी 70.68 टक्के मतदान

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या तीन जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत सरासरी 70.68 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

हसनापूर ग्रामपंचायतीच्या एक जागेसाठी मतदान पार पडले. एकूण 523 मतदारांपैकी 440 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तेथे 84.13 टक्के मतदान झाले. गोगलगावला एका जागेसाठी मतदान झाले. एकूण 459 पैकी 331 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तेथे 72.11 टक्के मतदान झाले.

तर लोणी खुर्दला एका प्रभागातील एका जागेसाठी मतदान घेण्यात आले. मतदार संख्या जास्त असल्याने तेथे एका प्रभागाचे चार मतदान केंद्र करण्यात आले होते.3932 मतदारांपैकी 2702 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तेथे 68.72 टक्के मतदान झाले. असे तीनही ग्रामपंचायतींसाठी सरासरी 70.68 टक्के मतदान झाले. ही सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

आज मतमोजणी!

या तिनही गावांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज बुधवारी 22 रोजी सकाळी 10 वाजता राहाता येथील तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com