
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
करोना मुळे जवळपास दोन वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या राहाता तालुक्यातील 26 सहकारी सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या दरम्यान च्या मुदत संपलेल्या सहकारी सोसायट्यांच्या या निवडणुका होत आहेत. या 26 पैकी काही सहकारी सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तर काहींची सुरू होणार आहे. विविध टप्प्यात या निवडणूक घेतल्या जात आहेत. 26 सोसायटी, सहकारी संस्थांमध्ये नांदुर खुर्द सोसायटी, पाथरे बु. म. प. सोसायटी, खडकेवाके सोसायटी, प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटी सेवकांची सह पतसंस्था मर्या लोणी बु., ल. शं. कोते पा. वाकडी नंबर 1 सोसायटी, या सोसायटीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात याची प्रक्रिया सुरू झाली होती. यातील पाथरे बु. ची निवडणूक झाली.
कालपासून साकुरी विविध कार्यकारी सोसायटी, अस्तगाव नंबर 1, रामपूरवाडी सोसायटी, अस्तगाव नंबर 2, निमगाव सोसायटी, ममदापूर सोसायटी, हनुमान सोसायटी बाभळेश्वर, पिंप्रीलोकई सोसायटी यांतील काहींची प्रक्रिया सुरू झाली तर काहींची दोन दिवसांनंतर सुरू होत आहे. अन्य सोसायटी अशा - लोणी बु. सोसायटी, नांदुर्खी खुर्द सोसायटी, डोर्हाळे सोसायटी, पिंपळस सोसायटी, सावळीविहीर खुर्द सोसायटी, लोहगाव सोसायटी, बाभळेश्वर सोसायटी, रांजणगाव खुर्द सोसायटी, केलवड खुर्द सोसायटी, गोगलगाव सोसायटी, राहाता ग्रृप सोसायटी, ममदापूर चारी नंबर 4 सोसायटी, आदी सोसायटीच्या निवडणुका होत आहेत. यातील काहीं सोसायटींच्या निवडणुका बिनविरोधही झाल्या आहेत. त्या जाहिर करणे बाकी आहेत. तर काही होऊ घातल्या आहेत. या सोसायट्यांमध्ये दोन तीन अपवाद सोडले तर बहुतांशी सोसायट्या ह्या आमदार विखे पाटील यांना मानणार्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे बहुतांशी सोसायट्या बिनविरोध होण्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी निवडणुका होऊ शकतात.
राहाता तालुक्यातील वरील 26 व शिल्लक असलेल्या 8 अशा जवळपास 34 ते 35 सोसायट्यांच्या निवडणुका मार्च 22 पर्यंत होणे अपेक्षित आहेत. उर्वरित 8 सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या सहायक निबंधक कार्यालयाने निवडणूक घेण्यासाठी मान्यतेला वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्या असल्याचे राहाता येथील सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी सांगितले.