
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
ग्रामीण भागातील शेतकर्यांना आर्थिक पत पुरवठ्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राहाता तालुक्यातील 15 सेवा सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे.
राहाता तालुक्यात जवळपास 73 सेवा सोसायट्या आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून या सेवा सोसायट्या शेतकर्यांना पीक कर्ज, शेतीपुरक मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप करतात. करोना संकटकाळात गेल्या दोन वर्षात बहुतांश सेवा सोसायट्यांच्या मुदती संपल्या होत्या. मध्यंतरी उच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश केल्यामुळे रखडलेल्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे.
या अंतर्गत सहकार निवडणूक प्राधिकरणाने राहाता तालुक्यातील 15 सेवा सोसायट्यांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये बाभळेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसा. बाभळेश्वर, गोगलगाव विविध कार्यकारी सेवा सोसा गोगलगाव, पुणतांबा नं. 2 विविध कार्यकारी सेवा सोसा. पुणतांबा, राहाता गृप विविध कार्यकारी सेवा सोसा. राहाता, ममदापूर चारी नं. 4 विविध कार्यकारी सेवा सोसा. ममदापूर, साकुरी विविध कार्यकारी सेवा सोसा. साकुरी, रामपूरवाडी विविध कार्यकारी सेवा सोसा. रामपूरवाडी, अस्तगाव नं. 2 विविध कार्यकारी सेवा सोसा. अस्तगाव, निमगाव विविध कार्यकारी सेवा सोसा. निमगाव, ममदापूर विविध कार्यकारी सेवा सोसा. ममदापूर, हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटी, पिंर्प्रीलोकाई विविध कार्यकारी सेवा सोसा पिंर्प्रीलोकाई या सेवा सोसायट्यांचा समावेश आहे. करोना संकटामुळे बर्याच कालावधीनंतर ग्रामीण भागातील निवडणुकांची धुळवड उडणार असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.