राज्यातल्या सत्ताबदलामुळे राहाता तालुक्याला विकासाची संधी

राज्यातल्या सत्ताबदलामुळे राहाता तालुक्याला विकासाची संधी

पिंपरी निर्मळ |वार्ताहर|Pimpari Nirmal

आघाडी सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना महसुल मंत्री पदाची मोठी संधी मिळाली असून राज्यातल्या या सत्ताबदलामुळे राहाता तालुक्याला विकासाची संधी उपलब्ध झाली आहे.

गेली साडे सात वर्ष सत्तेबाहेर राहीलेले व मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉग्रेसमधील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देवून भाजपावासी झालेले ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मत्रीपदामुळे जिल्ह्यातील प्रश्नासोबतच राहाता तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिकांच्या निवडणुकीतही भाजपाला नवी उभारी मिळण्याची शक्यता आहे. यात तालुक्यातील राहाता व शिर्डी नगर परीषदांसह पंचायत समिती व नगर जिल्हा परीषदेचा समावेश असणार आहे.

राज्यातल्या सत्ताबदलामुळे ना. विखे पाटलांच्या रूपाने राहाता तालुक्याला विकासाची संधी मिळाली असून या काळात तालुक्याचा विकास झपाट्याने होईल असा आशावाद नागरिकांमधुन व्यक्त होत आहे. जिल्हात 12 आमदार व दोन खासदार आहेत. त्यापैकी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे अवघे तीन आमदार निवडुन आले तर राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसचे दोन तर एक अपक्ष आमदार निवडुन आले होते. त्यावेळी भाजपा-सेना युती होती.

जिल्ह्यातील दोनही खासदार भाजपा-सेना युतीचे निवडून आले होते. 2024 मध्ये होणार्‍या सार्वत्रीक निवडणुकीत दोनही जागा राखणे व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामधील बहुतांश जागेवर सत्ताधारी भाजपा व मित्रपक्षाचे आमदार विजयी करणे व पक्ष संघटना मजबूत करणे यांची महत्वपूर्ण जबाबदारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर असणार आहे.

कोल्हार-कोपरगाव महामार्गाचे रखडलेले काम, पाच दशकापासून रेंगाळलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावणे, खडकेवाके येथील शेती प्रक्रीया केंद्राचा विकास, शिर्डी विमानतळावरून शेतीमाल वाहतूक, लम्पी रोगाचा प्रार्द्रुभाव रोखणे व अतिवृष्टीग्रस्तांना मदत, पिक विमा कंपन्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत मिळवून देणे, अतिवृष्टीने गावांना जोडणारे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून त्यांची दुरूस्ती करणे अशी अनेक कामे मार्गी लागणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com