राहाता तालुक्यात 243 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

35 बाधित; 7 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 243 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 35 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले आहेत. काल 07 रुग्ण बरे होऊन गेले असले तरी अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 243 झाली असून अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. राहाता तालुक्यात (Rahata)आतापर्यंत 216772 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 21503 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

खासगी रुग्णालयात 25 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 10 असे एकूण 35 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, दाढ बुद्रुक-02, चंद्रापूर-03, लोणी बुद्रुक-02, डोर्‍हाळे-01, नांदुर्खी बुद्रुक 01, केलवड बुद्रुक-01, साकुरी-01, दहेगाव-01, खडकेवाके-01, कोल्हार-04, निघोज-01, वाकडी-02, पुणतांबा-02, असे ग्रामीण 23 शिर्डी-05, राहाता-03, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 4 असे सर्व एकूण 35 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 243 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com