राहाता तालुक्यात नवीन 37 करोनाबाधित रुग्ण

197 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण तर 32 डिस्चार्ज
राहाता तालुक्यात नवीन 37 करोनाबाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 37 करोनाबाधित रुग्ण आढळूून (Covid 19 Positive Patient) आले असून 32 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 197 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid 19 Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24921 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 24737 रुग्ण बरे होवून घरी गेले.

जिल्हा रुग्णालयात-02 खासगी रुग्णालयात 33 तर अँटीजन चाचणीत 02 असे एकूण 37 नवीन रुग्ण आढळून आले आहे. राहाता तालुक्यातील अस्तगाव-02, चोळकेवाडी-01, पिंपरी निर्मळ-03, रांजणगाव-01, लोणी बुदुक-05, लोणी खुर्द-08, भगवतीपूर-02, बाभळेश्वर बुद्रुक-01, पुणतांबा-01, नांदूर खुर्द-02 असे 25 तर शहरी शिर्डी-09 राहाता-01 व अन्य-02असे सर्व एकूण 37 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com