राहाता तालुक्यात 28 करोनाबाधित रुग्ण

227 अ‍ॅक्टीव्ह तर 45 रुग्णांना डिस्चार्ज
COVID-19
COVID-19

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 28 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळूून आले असून 45 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 227 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid 19 Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka)आतापर्यंत 24751 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 24537 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-01, खासगी रुग्णालयात 19 तर अँटीजेन चाचणीत 08 असे एकूण 28 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) ममदापूर-01, लोणी बुद्रुक-04, लोणी खुर्द-03, वाळकी-2, साकुरी-01, आडगाव बुद्रुक-01, कोल्हार-01, बाभळेश्वर बुद्रुक - 02, तिसगाववाडी - 01, लोहगाव-02, सावळीविहिर बुद्रुक-02, रास्तापूर-02, असे 22 तर शहरी शिर्डी-03 राहाता-02 व अन्य-01 असे सर्व एकूण 28 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com